इंटरनेट बंद, तरीही तगडे बिल
By Admin | Updated: June 29, 2016 00:22 IST2016-06-29T00:22:45+5:302016-06-29T00:22:45+5:30
रिलायन्सची इंटरनेट सेवा अनेक दिवस बंद असतानाही बंद ग्राहकांना तगडे पोस्टपेड बिल पाठविण्यात आले आहेत.

इंटरनेट बंद, तरीही तगडे बिल
रिलायन्सचा कारभार : हजारो ग्राहकांचे नुकसान
अमरावती : रिलायन्सची इंटरनेट सेवा अनेक दिवस बंद असतानाही बंद ग्राहकांना तगडे पोस्टपेड बिल पाठविण्यात आले आहेत. ते भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याने राज्यातील असंख्य ग्राहकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी ग्राहक मंचात दाद मागण्याचे ठरविले आहे.
रिलायन्सची इंटरनेट सेवा २२ जून रोजी सुरू झाली. यापूर्वी अनेक दिवस सेवा अचानक बंद झाल्याने रिलायन्सची इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे अमरावतीसह राज्यातील अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. बंद असलेल्या पोस्टपेड सेवेचे विनाकारण बिल पाठविण्यात आल्यामुळे हे बिल का भरावे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात अनेक ग्राहकांनी रिलायन्सच्या सर्व्हिस सेंटरला फोन लावला असता कंपनीचे धोरण आहे. आलेले बिल भरावेच लागेल, असे उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे. रिलायन्सने डोंगल आयपॉड काढले होते. ते अनेक लोकांनी इंटरनेट सेवेसाठी विकत घेतले रिलायन्सची पोस्टपेड सेवा घेतली. अंदाजे अडीच हजार रुपये डाटा मोडेम विकत घेण्यात आले होते. पण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून २२ जूनपर्यंत पूर्वसूचना न देता ही सेवा बंद करण्यात आल्यामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रिलायन्सची इंटरनेट सेवा वापरणारे ज्यांना बंद असलेल्या सेवेचे पोस्टपेड बिल पाठविले, असे अमरावतीत ४०० ग्राहक आहेत. ४ जी सेवा अपग्रेडसाठी सीडीएमएम नेटवर्क बंद केले आहे.
पूर्वसूचना न देता प्री-पेडची सेवाही बंद
ज्या ग्राहकांनी रिलायन्सच्या इंटरनेट सेवेसाठी प्री-पेड प्लॅन घेतला आहे त्या प्लॅनची व्हॅलिडिटी डाटाचे नुकसान झाले आहे. ती सेवा अचानक बंद केल्यामुळे त्या ग्राहकांनी पैसे भरून वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन घेतले आहेत. त्यांच्या पैशाचे काय, असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडला आहे. त्यांनी या संदर्भात सेवा चालू झाल्यांनतर कस्टमर केअरला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.
पैसे भरण्यासाठी एकाच ग्राहकांना ३० ते ४० मॅसेज
रिलायन्सने एकतर सेवा अनेक दिवस बंद असतांना त्यांच्या ग्राहकांना विनाकारण बिल पाठविले व हि बिल भरण्यासाठी एका ग्राहकांच्या मोबाईलवर बिल भरण्यासाठी ३० ते ४० मॅसेज पाठविण्यात येत आहे. हे मॅसेज रात्री बे रात्री येत असल्यामुळे ग्राहकांच्या झोपा खराब होत असल्याचे एका ग्राहकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.