आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

By Admin | Updated: June 29, 2016 00:16 IST2016-06-29T00:16:00+5:302016-06-29T00:16:00+5:30

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणी कुठलीही कारवाई होत नसल्याने मंगळवार २८ जून रोजी प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात ....

Interference | आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

प्रहारचे आंदोलन : शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला जाब
अमरावती : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणी कुठलीही कारवाई होत नसल्याने मंगळवार २८ जून रोजी प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे यांना घेराव घालत जाब विचारला.
आंदोलकाच्या मागणयामध्ये शिक्षण विभागाने सन २००९-१० मध्ये भरती प्रक्रियेव्दारे नव्याने २४८ उपशिक्षकांची नियमबाह्य पदे भरल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरणी शिक्षकांवर झालेला अन्याय दुर करावा, ५ मार्च २०१५ च्या पेसा कायद्यानुसार मेळघाटातील शिक्षक संवर्गातील १४ पदांपैकी ४३९ पदे आंतर जिल्हा बदलीने भरण्याबाबत शासनाला मार्गदर्शन मागावे, आंतर जिल्हा बदलीने २००७ ते १६ पर्यत शिक्षक संवर्गातील यादी शासन आदेशा नुसार अद्यावर करण्याच्या दुष्टीने एक दिवसीय शिबीर घेण्यात यावे, बिंदुनामवली संवर्गातील रोस्टर उपायुक्त मागासवर्ग विभागाकडे सादर केलेल्या प्रती द्याव्यात ,संभाव्य सेवानिवृत्तने व इतर यांच्या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या पदावर आंतरजिल्हा बदलीने सामावून घेण्यात यावे, सन २००९-१० मधील भरती प्रक्रियेतील उर्वरित शिक्षण सेवकांना आंतर जिल्हा बदलीचे प्रकरणे मागीर लागे पर्यत सामावून घेण्यात येवूृ नये आंदोलनात प्रहारचे छोटू महाराज वसू, चंदु खेडकर, प्रदिप वडस्कर, विजय खटके शिक्षण कृती समितीचे महेश ठाकरे व शिक्षक उपस्थित होते.

अखेर प्रशासन नमले
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रकरणी जिल्हा परिषदेचे प्रशासन उदासीन आहे. शिक्षणाधिकारी पानझाडे आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांना स्वत: सांगूनही गेल्या सात वर्षाची माहिती उपलब्ध करून देवू शकत नाहीत.अखेर प्रहारने आंदोलनापुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले.

शिक्षणाधिकारी यांच्याकडून आंतरजिल्हा बदलीबाबत ठोस कारवाई करण्या संदर्भात लेखी स्वरुपात पत्र घेतले आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यानंतरही कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करु.
- छोटू महाराज वसू,
जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना

 

Web Title: Interference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.