आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या
By Admin | Updated: November 3, 2016 00:24 IST2016-11-03T00:24:08+5:302016-11-03T00:24:08+5:30
आंतरजिल्हा बदलीसाठी प्राप्त ४२९शिक्षकांनी शासनाने विहित केलेल्या पध्दतीनुसार जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केले .

आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या
धरणे आंदोलन : बदलीच्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करा
अमरावती : आंतरजिल्हा बदलीसाठी प्राप्त ४२९शिक्षकांनी शासनाने विहित केलेल्या पध्दतीनुसार जिल्हा परिषदेकडे अर्ज सादर केले . मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही.त्यामुळे आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकाच्या प्रस्तावाचा निपटारा करावा यासह अन्य मागण्यासाठी बुधवार पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत सन २००७ पासून शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीबाबत कुठलीच अंमलबजावणी शिक्षक विभागाने केली नाही. या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन व आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयन्न केला . सद्यास्थितीत बदलीसाठी पात्र असलेल्या ४२९ शिक्षकांना शासनाने ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार अर्ज करूनही त्याचा विचार जिल्हा परिषद प्रशासनाने केला नाही. उलट शासनाची दिशाभूल करून २०१०्- २०११ च्या रिक्त पदांचा चुकीचा अहवाल शिक्षण संचालकाकडे सादर केला. सरळ सेवाभरतीने शिक्षकांची नियमबाहय २४८ पदे भरल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघनेने केला आहे.२ नोव्हेबर पासून विभागीय आयुक्त कार्यालया समोर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन कर्त्या शिक्षकांच्या प्रमुख मागण्यामध्ये नियमबाह्य शिक्षक भरतीची चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाई करण्यात यावी, विद्यार्थ्याचा शैषणिक दुष्टया विचार करून सद्यास्थितीत शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, आंतरजिल्हा बदली करिता वाढीव पदांना मान्यता अथवा पोकळ बिंदू नामावलीचा अवलंब करावा, आंतरजिल्हा बदली सेवाज्येष्ठता यादीतून गहाळ झालेल्या प्रस्वाचासंबंधी दोषीवर कारवाई करावी, खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनव सीईटी २०१० मधील पात्र प्रतिक्षारत शिक्षण सेवकांना रूजू करण्यापूर्वी आंतरजिल्हा बदली शिक्षकांना रिक्त जागी पदस्थापना देण्यात यावी, आदी मागण्यासाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक महेश ठाकरे,नागसेन रामटेके, निलेश बुटले, नंदकिशोर धर्म, अमोल वऱ्हेकर, अनिनाश मेश्राम, सुरज सोनटक्के, राहूल चर्जन, निलेश रसे, सारंग धामनकर आदींचा सहभाग आहे.