शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगाव येथील प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 19:18 IST

अमरावती नजीकच्या गोरेगाव येथील वीरेंद्र राजूलाल आहाके (२२) आणि अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री रेल्वेखाली आत्महत्या

 अमरावती -  नजीकच्या गोरेगाव येथील वीरेंद्र राजूलाल आहाके (२२) आणि अल्पवयीन मुलीने रविवारी रात्री रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.वरूड तालुक्यातील गोरेगाव येथील या युगुलाचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या आंतरजातीय प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध असल्याने शनिवार २३ जूनला रात्री ९.३० च्या सुमारास ते घरून पळून गेले. त्यांनी लग्न करण्याचा कायदेशीर प्रयत्न केला. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने ते यशस्वी होऊ शकले नाही. अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. वीरेंद्र याने रविवारी रात्री घरी फोन करून 'हा माझा शेवटचा फोन' असल्याचे सांगितल्याने रात्रीपासूनच शोधाशोध सुरू केल्याची चर्चा होती.  रविवारी रात्री हताश होऊन त्यांनी नरखेड-अमरावती रेल्वेमार्गावरील बेनोडा गोरेगाव रस्त्यावरील पुलाजवळील रुळावर झोपून मालगाडीखाली आपली जीवनयात्रा संपविली. बेनोडा पोलिसांना वरूड येथील रेल्वे कर्मचा-यांना काचीकुडा एक्सप्रेसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीच्या आधारे धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. छिन्नविछीन्न अवस्थेतील दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास ठाणेदार वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.तायडे,ए.एस.आय.भाकरे, हे.काँ.संतोष औंदकर, पो.काँ.दिनेश राऊत करीत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याAmravatiअमरावतीPoliceपोलिसCrimeगुन्हाmarriageलग्न