आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह धनोडीला झाल्यास तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST2020-12-31T04:13:31+5:302020-12-31T04:13:31+5:30

भाजपचा इशारा, वनविभागाच्या जमिनीवर बांधकामाचा घाट, आदिवासी संघटनांचा आरोप वरूड-जरूड : स्थानिक आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह अनेक वर्षांपासून वरुड येथे ...

Intense agitation if Dhanodi hostel for tribal boys and girls | आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह धनोडीला झाल्यास तीव्र आंदोलन

आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह धनोडीला झाल्यास तीव्र आंदोलन

भाजपचा इशारा, वनविभागाच्या जमिनीवर बांधकामाचा घाट, आदिवासी संघटनांचा आरोप

वरूड-जरूड : स्थानिक आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह अनेक वर्षांपासून वरुड येथे भाड्याने जागा घेऊन सुरू आहे. आदिवासी विकास विभागाने येथून पाच किमी अंतरावर असलेल्या धनोडी येथे वनविभागाच्या जागेत वसतिगृह बांधण्याचा घाट घातला आहे. मात्र, सदर वसतिगृह हे वरूड नगर परिषद हद्दीतच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांसह भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांनी निवेदन देऊन तहसीलदारांकरवी शासनाकडे केली. धनोडी येथील वसतिगृह रद्द झाले नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. दिला आहे .

निवेदनानुसार, शासनाने हक्काच्या जागेत मुलामुलींचे वसतिगृह बांधण्या करिता हालचाली सुरू केल्या. परंतु, ती जागा शहरापासून पाच किमी दूर व वनविभागाच्या अखत्यारीत आहे. गतवर्षी या प्रस्तावाला आदिवासी संघटनांनी तीव्र विरोध करून वरूड नगर परिषद हद्दीत सदर वसतिगृह बांधकाम करावे, असे म्हटले होते. आदिवासी मुलामुलींना पाच किमी अंतरावरून चालत येऊन शाळा-महाविद्यालयात येणे सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य नाही, असे या संघटनांचे म्हणणे होते. आता पुन्हा प्रकल्प अधिप्ऱ्यांनी धनोडी येथे मलकापूर रस्त्यावर आदिवासी वसतिगृह प्रस्तावित केले आहे. ती जागा रद्द करण्यात यावी, अशी मागणी विजय श्रीराव, भोलेनाथ वाघमारे यांच्यासह आदिवासी बांधवांनी केली. खासदार रामदास तडस , जिल्हाधिकारी, अप्पर आदिवासी आयुक्त व आयुक्त (नाशिक) यांना याबाबत अवगत केले आहे.

Web Title: Intense agitation if Dhanodi hostel for tribal boys and girls