शिक्षकांकडील बीएलओची कामे काढण्याचे निर्देश

By Admin | Updated: June 27, 2016 00:11 IST2016-06-27T00:11:06+5:302016-06-27T00:11:06+5:30

जुळ्या शहरातील दुकाने ईद सणानिमित्त रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यासोबत...

Instructions for the work of the BLO to the teachers | शिक्षकांकडील बीएलओची कामे काढण्याचे निर्देश

शिक्षकांकडील बीएलओची कामे काढण्याचे निर्देश

गृहराज्यमंत्र्यांचे आदेश : शहरातील दुकानांना रात्री १२ पर्यंत सूट
परतवाडा : जुळ्या शहरातील दुकाने ईद सणानिमित्त रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यासोबत अचलपूर व चांदूरबाजार मतदारसंघातील शिक्षकांकडे असलेली मतदार नोंदणी (बीएलओ)ची कामे काढण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी रविवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
राज्याचे गृह व नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील रविवारी परतवाडा व अचलपूर येथे विविध कार्यक्रमासाठी आले असता काही शिक्षकांनी त्यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. त्यामध्ये अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील जवळपास साडेतिनशे शिक्षकांकडे बीएलओ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कामे सोपविण्यात आली आहे. नवीन मतदान नोंदणी करणे, मतदान कार्ड वाटप करणे, मतदार यादी शुद्धीकरण आदी कामे सोपविण्यात येतात. ती कामे सरसकट काढून घेण्याची मागणी शिक्षकांनी रणजित पाटील यांना केली. शाळेव्यतिरिक्त असलेली कामे करणे शक्य होत नसल्याच्या अडचणी यावेळी शिक्षकांनी मांडल्या.

जुळे शहर रात्री १२ पर्यंत सुरू
मुस्लीम बांधवाचा पवित्र रमझान महिना सुरू असून परतवाडा व अचलपूर शहराची अतिसंवेदनशील म्हणून नोंद आहे. मात्र ईद सणानिमित्त दोन्ही शहरांतील दुकाने रात्री १९ वाजेपर्यंत सुरू राहू देण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिले. त्यामुळे कालपर्यंत १० वाजता बंद होणारी जुळ्या शहरातील दुकाने ईद सणानिमित्त रात्री १२ पर्यंत सुरू राहणार आहे. राज्यात अकोला व वाशीम येथे यापूर्वीच तसे आदेश देण्यात आले आहे.

गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शिक्षकांकडे असलेली बीएलओची कामे काढण्यासोबत जुळ्या शहरातील दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत ईद सणाच्या पार्श्वभूमिवर सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सांगितले असून तसे निर्देश येताच त्याचे पालन करण्यात येईल.
- व्यंकट राठोड,
उपविभागीय अधिकारी, अचलपूर

Web Title: Instructions for the work of the BLO to the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.