शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

योग्य पाणी तपासणीसाठी जलसेवकांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:00 PM

आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आढळलेल्या दूषित पाण्यामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच कार्यकारी अभियंता एस.एस. कोपुलवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. योग्य पद्धतीने पाणी तपासणी करून तो अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसेवकांना दिल्या. दूषित पाणी तपासणीवेळी संबंधित ग्राहकांच्या स्वाक्षºया घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ...

ठळक मुद्देअहवाल मागविला : पाणी तपासणीवेळी ग्राहकांची सही अनिवार्य

आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आढळलेल्या दूषित पाण्यामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच कार्यकारी अभियंता एस.एस. कोपुलवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. योग्य पद्धतीने पाणी तपासणी करून तो अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसेवकांना दिल्या. दूषित पाणी तपासणीवेळी संबंधित ग्राहकांच्या स्वाक्षºया घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तब्बल ९० हजार कुटुंबीयांना शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध टाक्यापर्यंत पाइपलाइनद्वारे या शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. शहरातील नाल्यांतून ही पाइपलाइन गेलेली असून गळतीमुळे नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा ग्राहकांना होत असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. मजीप्राच्या पाइप लाइनमधून ३० टक्के गळतीचे प्रमाण असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो.प्राधिकरण वर्तुळात खळबळ'अमरावतीत शुद्ध पाण्याची नो गॅरन्टी' या मथ्यळ्याखाली 'लोकमत'ने लोकदरबारी वृत्त प्रकाशित करताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत कार्यकारी अभियंता कोपुलवार यांनी पाणी तपासणीची गंभीरता लक्षात घेता जलसेवकांना सूचना देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सोबतच पाणी तपासणीचे नमुने घेताना संबंधित ग्राहकांची स्वाक्षरी घेऊन त्यांच्यासमोरच पाणी नमुने घेण्याचे निर्देश दिले. पाणी तपासणीबाबतचा अहवालसुद्धा त्यांनी मागविला आहे.पाणी गळती बंद करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्नशहरात ३० टक्के पाणी गळतीचे प्रमाण आहे. कुठेही पाणी गळती आढळल्यास मजीप्रा विभागाशी संपर्क साधावा. पाणी गळती थांबविण्यासाठी मजीप्रा अधिकारी युद्धस्तरावर काम करीत आहे. मात्र, काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार झाल्यामुळे पाणी गळतीचे ठिकाण ट्रेस करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, त्यावरही उपाययोजना मजीप्रा करीत आहे. रहाटगाव ते वडगाव दरम्यानची पाणी गळती बंद करण्यासाठी मजीप्रा यंत्रणा कामाला लागली आहे.पाणी तपासणी योग्य पद्धतीने करणे जलसेवकांना बंधनकारक आहे. दरम्यान संबंधित ग्राहकांची स्वाक्षरी घेण्याच्या सूचना देऊ. त्यासंबंधाने अहवाल मागविण्यात येईल.- एस.एस.कोपुलवार,कार्यकारी अभियंता