विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन समितीपंचायत समित्यांना सूचना : जिल्ह्यात १८ समित्यांचे गठन, नियंत्रकांची नियुक्ती
By Admin | Updated: June 24, 2015 00:32 IST2015-06-24T00:32:59+5:302015-06-24T00:32:59+5:30
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता प्रत्येक तालुक्यात शालेय परिवहन समिती गठित केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन समितीपंचायत समित्यांना सूचना : जिल्ह्यात १८ समित्यांचे गठन, नियंत्रकांची नियुक्ती
सुरेश सवळे चांदूरबाजार
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता प्रत्येक तालुक्यात शालेय परिवहन समिती गठित केली जाणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियंत्रणात जिल्ह्यात १८ समित्यांचे गठन करण्यात आले आहे. याबाबत पंचायत समितीस्तरावर सूचनादेखील देण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी गृहविभागाने शाळा प्रशासनावर सोपवली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षित ने-आण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन केली जाणार आहे. येथील समितीच्या अध्यक्षस्थानी शाळेचा प्राचार्य राहणार आहे. यासह तालुकास्तरावरदेखील परिवहन समित्यांचे गठन करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून याबाबत शिक्षण विभागाला मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीबाबत पत्र दिले आहे.
समितीच्या अध्यक्षस्थानी शाळेचा प्राचार्य असेल, एक पालक-शिक्षक संघाचा प्रतिनिधी, संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक, पोलीस निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक, शिक्षण निरीक्षक, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी आणि एक स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी यांचा समितीत समावेश राहणार आहे. जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत दिलेले निर्देश स्कूल बस धोरण नियमानुसार अमरावती शहर व जिल्ह्याकरिता तालुकानिहाय शालेय परिवहन समिती गठित करणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुक्यात मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी त्यांच्या क्षेत्रातील शाळांमधील परिवहन समितीच्या बैठकीस प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचे प्रादेशिक परिवहन आयुक्तांनी आदेशित केले आहे.
नियंत्रकांची नियुक्ती (महापालिका क्षेत्र)
ए. एच. ताकसांडे, एस. एस. ढेंबरे (नांदगाव पेठ, फ्रेजरपूरा)
बी. ए. प्रधान, एन. बी. काळबांडे (गाडगेनगर, नागपुरी गेट)
व्ही. एच. गुल्हाने, व्ही. बी. मोरे (राजापेठ, बडनेरा)
एस. बी. चोरे, पी. एच. यादव (कोतवाली, खोलापुरीगेट)
ग्रामीण क्षेत्र
जी. एम. शेलार (अमरावती), आर. जी. जाधव (मोर्शी, वरूड), ए. एन. काकड (अचलपूर), व्ही. एस. गांगुर्डे (दर्यापूर), व्ही. एस. महाजन (चिखलदरा, धारणी), पी. आर. सरोदे (धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे), एस. बी. गोसावी (तिवसा), आर. आर. देवरे (चांदूरबाजार), व्ही. एच. गुल्हाने (नांदगाव खंडेश्वर), एम. बी. मडके (अंजनगाव सुर्जी).