हेरिटेजकडे प्रस्ताव सादर करण्याचे नगररचना विभागाला निर्देश
By Admin | Updated: July 8, 2015 00:21 IST2015-07-08T00:21:40+5:302015-07-08T00:21:40+5:30
अंबानगरीत असलेल्या पुरातन वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महापालिकेला सन २०११ पासून एक

हेरिटेजकडे प्रस्ताव सादर करण्याचे नगररचना विभागाला निर्देश
बैठक : सुनील देशमुख यांनी घेतला मनपा अधिकाऱ्यांनकडून आढावा
अमरावती : अंबानगरीत असलेल्या पुरातन वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महापालिकेला सन २०११ पासून एक रूपयांचाही निधी मिळाला नसल्याने सहायक संचालक नगररचना विभागाने तातडीने नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आ. सुनील देशमुख यांनी मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
महापालिका प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या विविध प्रशासकीय कामांचा आढावा १९ मे रोजी आ. सुनील देशमुख यांनी घेतला होता, यादरम्यान शहरात करण्यात येणारे विकासाचे प्रत्येक काम कशा पध्दतीने व्हावे याकरिता आमदारांनी मनपा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त व प्रशासनाने केलेल्या कामकाजाचा विस्तृत आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात ७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत शहरात महापालिकेने पावसाळयापूर्वी किती नाल्याची सफाई केली यांची माहिती घेतली असता इतवारा बाजार आणि मालविय चौक या दोन ठिकाणचा अपवाद वगळता अंबानाला व इतर ठिकाणच्या नाल्याची सफाई समाधानकारक झाली नसल्याने आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याशिवाय शहरात ८०० ठिकाणी वृक्षारोपणासाठी मनपाने सुमारे ८०० खड्डे केले आहेत.