शिक्षण विभागातील पद भरतीचे निर्देश
By Admin | Updated: September 19, 2015 00:22 IST2015-09-19T00:22:23+5:302015-09-19T00:22:23+5:30
प्राथमिक शिक्षण विभागाकडील केंद्र प्रमुखांची १ हजार ४८ व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५०१ अशी ...

शिक्षण विभागातील पद भरतीचे निर्देश
आदेश : शिक्षण आयुक्त भापकर यांचे जिल्हा परिषदेला पत्र
अमरावती : प्राथमिक शिक्षण विभागाकडील केंद्र प्रमुखांची १ हजार ४८ व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५०१ अशी एकूण राज्यभरातील १ हजार ५४९ पदे रिक्त आहेत. शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व शिक्षकांचे काम याबाबत पर्यवेक्षण करण्याचे काम या पदावरील व्यक्ती करीत असतात ही पदे मोठ्या संख्येने रिक्त असल्याने त्याचा शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे. ही पदे तातडीने भरणेबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहे.
प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता उंचावण्यासाठी केंद्रीय प्राथमिक शाळांची स्थापना केली. दहा प्राथमिक शाळांसाठी एक या प्रमाणात राज्यात ५ हजार ८६० केंद्रीय शाळा स्थापन केल्यावरही केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. १९९४ नंतर प्राथमिक शाळांच्या संख्येत मोठी वाढ झाली असूनही केंद्र प्रमुखाची पदे वाढलेली नाहीत. शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गातील एक हजार ८०९ मंजूर पदांपैकी ५०१ पदे रिक्त आहेत. (प्रतिनिधी)