अध्यापनाच्या मूल्यवर्धनासाठी प्रेरणादायी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:07 IST2017-12-15T23:06:57+5:302017-12-15T23:07:23+5:30
विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या शिक्षकांनी अध्यापनाच्या मूल्यवर्धनासाठी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख यांनी केले.

अध्यापनाच्या मूल्यवर्धनासाठी प्रेरणादायी उपक्रम
आॅनलाईन लोकमत
अमरावती : विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या शिक्षकांनी अध्यापनाच्या मूल्यवर्धनासाठी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख यांनी केले. ते शुक्रवारी शिक्षणाची वारी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना बोलत होते.
शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांची जलद गतीने प्रगती व्हावी, यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षणाची वारी या उपक्रमाला १५ डिसेंबर रोजी येथील श्री शिवाजी शारीरिक महाविद्यालयाच्या मैदानावर प्रारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर प्राची साठे, सुनील मगर, सीईओ किरण कुलकर्णी, शिक्षण उपसंचालक चंदनसिंह राठोड, रवींद्र आंबेकर, सिद्धेश वाडकर, सुभाष कांबळे, पिराजी पाटील, हेमंत पवार, आर.डी तुरणकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. शालेय शिक्षण विभागद्वारा शैक्षणिक विचारांची उपयोगिता व परिणामकारकता यांच्या आदानप्रदानासाठी शिक्षण वारीतून बोध घेऊन त्याचे अनुकरण करण्याचे आवाहनदेखील देशमुख यांनी केले. यावेळी उपस्थितांनी मनोगत मांडले. वारीत ५३ स्टॉल लावले आहेत. शिक्षणाच्या वारीमध्ये शैक्षणिक साहित्य, गुणवता विकासाचे प्रयोग यांची मांडणी करण्यात आली आहे. राज्यात काही शाळांमधील शिक्षकांनी लोकसहभागातून टॅब उपलब्ध करून विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी हातभार लावण्याचा प्रयन्न केला आहे. वारीतून शिक्षकांनाही नवीन शिकता यावे, त्याना शैक्षणिक गुणवता उंचावण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा आयोजनामागील उद्देश आहे.