शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकांकडून स्वच्छता, जलजीवनच्या कामाची तपासणी; ‘ऑन द स्पॉट’ व्हिजिट विविध गावांत भेटी व संवाद

By जितेंद्र दखने | Updated: March 13, 2024 20:07 IST

आतापर्यंत अमरावती व अचलपूर या दोन तालुक्यांतील १६ गावांपैकी १३ गावांची केंद्रीय पथकाने तपासणी केली आहे.

अमरावती: केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची ९ मार्चपासून केंद्राच्या पथकाकडून जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन ‘ऑन द स्पॉट’ स्वच्छता जलजीवन मिशनच्या कामांची तपासणी दोन सदस्यीय समितीकडून केली जात आहे. आतापर्यंत अमरावती व अचलपूर या दोन तालुक्यांतील १६ गावांपैकी १३ गावांची केंद्रीय पथकाने तपासणी केली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशनच्या कामांच्या तपासणीसाठी केंद्रीय पथकात व्होरा प्रसाद राव व अजय सक्सेना या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

या दोन सदस्यीय पथकाने अमरावती आणि अचलपूर तालुक्यातील १६ गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन येथील वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व जलजीवन मिशनअंतर्गत वैयक्तिक कुटुंबाकडील नळजोडणी, तसेच पाणी गुणवत्ताविषयक बाबींची तपासणी, पाणी स्रोतातील पाणी नमुने, पाणीपुरवठा करणाऱ्या टाकी, शाळा अंगणवाडी आदी ठिकाणी भेटी देऊन तेथे विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आदींसोबत संवाद साधून त्यांच्याकडून काही समस्या आहेत का, याची पडताळणी केलेली आहे. याशिवाय स्थानिक नागरिकांशी संवाद साधून नळजोडणीद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे किंवा नाही, याबाबतही माहिती जाणून घेतली.यासोबतच गावातील वैयक्तिक शौचालय कुटुंबाची ऑनलाइन यादी, सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेची पाहणी, ग्रामीण आरोग्य पोषण आहार, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त दस्तऐवज तपासणी, पाणी गुणवत्ताविषयक तपासणीकरिता निवड केलेल्या पाच महिलांकडून तपासणी केलेल्या कामाची माहिती आदींचा लेखाजोखा केंद्रीय चमूने १३ गावांत प्रत्यक्ष जाऊन तपासला आहे. या पथकांच्या तपासणीचा गुरुवार, १४ मार्च हा अखेरचा दिवस आहे. तपासणीदरम्यान यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा, तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी, एमजीपीचे अभियंता, बीडीओ विस्तार अधिकारी यादरम्यान उपस्थित होते. ...या गावांना भेटीजिल्हा मुख्यालयात आढावा घेतल्यानंतर केंद्रीय चमूने गत दोन तीन दिवसात अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी, अंबाडा कंडारी, असदपूर, बळेगाव, भिलोना, अमरावती तालुक्यातील लोणटेक, मलकापूर, वडगाव माहोरे, अंजनगाव बारी, कुंड सर्जापूर, कठोरा बु., नांदुरा पिंगळाई, अचलपूरमधील बेलखेडा, भुगाव आदी गावांत ‘ऑन द स्पॉट’ कामांची तपासणी व नागरिकांसोबत थेट संवाद साधला जात आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती