शहरातील नाल्यांची आयुक्तांद्वारा पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:13 IST2021-05-14T04:13:39+5:302021-05-14T04:13:39+5:30

अमरावती : महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी गुरुवारी भुतेश्‍वर चौक नाला, कालीमाता मंदिर नाला, भातकुली रोड नाला, हनुमान नगर ...

Inspection of nallas in the city by the Commissioner | शहरातील नाल्यांची आयुक्तांद्वारा पाहणी

शहरातील नाल्यांची आयुक्तांद्वारा पाहणी

अमरावती : महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी गुरुवारी भुतेश्‍वर चौक नाला, कालीमाता मंदिर नाला, भातकुली रोड नाला, हनुमान नगर नाला, अंबानाल्‍याची पाहणी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाले जे.सी.पी.द्वारे साफ सफाई करण्‍याचे काम सध्या सुरू आहे

काही परिसरात पावसाळ्यात नागरिकांच्‍या घरात पाणी शिरण्‍याच्‍या घटना घडतात. त्यामुळे परिसरातील नाल्‍यातून निघणारा गाळ त्‍वरित उचलण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांनी नाल्‍यात कचरा टाकू नये, ज्‍या ठिकाणी जे.सी.पी. जाऊ शकत नाही तेथे लहान यंत्राच्‍या किंवा मनुष्‍यबळाच्या साह्याने नाला साफ करावयाच्‍या सूचना त्यांनी दिल्‍या. अंबानाल्‍यातील संपूर्ण गाळ काढण्‍याचे निर्देश देण्‍यात आले. पाणी साचणार नाही या दृष्‍टीने कार्य करण्‍याच्‍या सूचना यावेळी कार्यकारी अभियंता सुहास चव्‍हाण यांना देण्‍यात आल्‍या.

Web Title: Inspection of nallas in the city by the Commissioner