शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

खरपी, रवाळा नाक्यावर ‘जीएसटी’ पथकाद्वारे तपासणी; आंतरराज्य सीमेवर करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 15:07 IST

१६ अधिकारी, ४० कर्मचाऱ्यांचे पथक तैनात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई राज्य कर जीएसटी विभागाद्वारे होत आहे.

अमरावती : महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या खरपी व रवाळा या आंतरराज्य सीमेवर राज्य कर (जीएसटी) अधिकाऱ्यांद्वारे वाहनांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या पथकाला पोलिस, राज्य उत्पादन शुल्क व आयकर विभागाने सहकार्य मिळत आहे. या विभागाचे १६ अधिकारी व ४० कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आलेले आहे व या पथकाद्वारे ही तपासणी होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई राज्य कर जीएसटी विभागाद्वारे होत आहे. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यात खरपी व वरुड तालुक्यातील रवाळा या दोन आंतरराज्य सीमेवरील नाक्यावर या पथकाद्वारे वाहन तपासणी सुरू करण्यात आली आहे. या पथकाद्वारे आतापर्यंत २०० वाहनांची तपासणी करण्यात आली आहे.

मार्च महिना व शासनाला अधिक महसूल देणारा हा विभाग असल्याने वसुलीच्या कामासोबतच निवडणुकीची कामे या विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे होत आहेत. यासाठी जीएसटी राज्य विभागाचे जिल्हा समन्वयक म्हणून उज्ज्वल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बाहेरच्या राज्यातून होणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर या पथकाची करडी नजर आहे. रोख रक्कम, दारू याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी या पथकाला, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर आदी विभागांचे सहकार्य मिळत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.तफावत आढळल्यास २०० टक्क्यांपर्यंत दंडमालाची वाहतूक करताना वस्तू व सेवा कर कायद्याचे कलम ६८ व नियम १३८ नुसार आवश्यक असणारे योग्य इनव्हाइस व ई-वे बिल आहे किंवा नाही याची तपासणी या विभागाचे मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. मालाची किंमत, वजन, संख्या टॅक्स इनव्हाइस व वाहनातील माल यात तफावत किंवा त्रुटी आढळल्यास नियम १२९ नुसार कराच्या २०० टक्क्यांपर्यंत दंड लावण्याची कठोर कारवाई या विभागाद्वारे होत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या राज्यातून होणारी मालाची वाहतूक, रोख रक्कम, दारू आदीबाबत आंतरराज्य सीमेवर पथकांद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. १६ अधिकारी व ४० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाचा वॉच आहे.संजय पोखरकरराज्य कर सहआयुक्त, अमरावती विभाग

टॅग्स :GSTजीएसटी