पेढी नदी पात्रालगतच्या १३ गावांची पाहणी

By Admin | Updated: August 6, 2016 00:07 IST2016-08-06T00:07:00+5:302016-08-06T00:07:00+5:30

राज्यात नद्यांनी रौद्रावतार धारण केले असून जिल्ह्यातील नद्या ओसंडून वाहत आहे.

Inspection of 13 villages on river Pardi | पेढी नदी पात्रालगतच्या १३ गावांची पाहणी

पेढी नदी पात्रालगतच्या १३ गावांची पाहणी

रवि राणा यांचा पुढाकार : पूर संरक्षण भिंतीसाठी ५ कोटी देणार
अमरावती : राज्यात नद्यांनी रौद्रावतार धारण केले असून जिल्ह्यातील नद्या ओसंडून वाहत आहे. या पार्श्वभूमिवर आ.रवि राणा यांनी पेढी नदी पात्रालगतच्या १३ गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना रविवारी दिलासा दिला. पूर संरक्षण भिंत उभारणी करण्यासह क्षतीग्रस्त नागरिकांना घरकूल दिले जाईल. त्याकरिात ५ कोटी रुपयांचा निधी उभारु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गत आठवड्यात जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आले आहे. त्यामुळे नाल्याच्या काठावरील घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
भातकुली तालुक्यात वाहणाऱ्या पेढी नदीच्या पात्रालगत असलेल्या १३ गावांना पुराचा फटका बसला. पूरग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी आ. रवि राणा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. घरांचे नुकसान, जीवनावश्यक वस्तुची हानी, रस्ते, नाल्याची पाहणी करून आपद्ग्रस्तांना शासकीय मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आ. राणा यांनी गावकऱ्यांना सांगितले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भातकुलीचे ठाणेदार आदींना सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना दिली. यावेळी भातकुलीचे उपसभापती संगीता चुनकीकर, नगराध्यक्ष महानंदा पवार, उपाध्यक्ष गिरीश कासट, गटनेता प्रवीण पवार, अ. शफीक अ. शरीफ, लता रायबोले, रेखा पवार, अश्विनी काळबांडे, शुद्धोधन सिरसाट, हरिदास मिसाळ, इरफान शहा, अनिल तिडके, शंकर डोंगरे, गणेश पाचकवडे, हर्षद वाचासुंदर, विनोद अबर्ते, प्रवीण मोहोड, पोलीस पाटील रवीेंद्र खांडेकर, सतीश मंत्री, प्रकाश खर्चान, विजय रायबोले आदी उपस्थित होते. दरम्यान नदी पात्रातून होत असलेल्या अवैध उत्खनाकडे आ. राणांनी महसूल विभागाचे लक्ष वेधले.

गणोरी येथील दारुबंदीवर वेधले ठाणेदारांचे लक्ष
भातकुली पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या गणोरी येथील महिलांना अवैध दारु विक्रीसाठी पोलीस आयुक्तांकडे दाद मागावी लागते. त्यामुळे ठाणेदार साहेब, काही तरी कर्तव्यावर जागा. महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून गणोरीतील दारुबंदी झाली नाही तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, अशी तंबी आ. रवि राणा यांनी ठाणेदार राऊत यांना दिली.

Web Title: Inspection of 13 villages on river Pardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.