चांदुर बाजार पालिकेतील कोट्यवधींच्या निविदा प्रक्रियेची होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST2021-06-11T04:09:38+5:302021-06-11T04:09:38+5:30
भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीरिची दखल; विभागीय आयुक्त कार्यालयाचे कारवाईचे आदेश चांदुर बाजार : स्थानिक नगर परिषदेला प्राप्त ...

चांदुर बाजार पालिकेतील कोट्यवधींच्या निविदा प्रक्रियेची होणार चौकशी
भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीरिची दखल;
विभागीय आयुक्त कार्यालयाचे कारवाईचे आदेश
चांदुर बाजार : स्थानिक नगर परिषदेला प्राप्त झालेल्या चौदाव्या वित्त आयोग व विशेष रस्ता निधी अंतर्गत ४ कोटी ६९ लाखांच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची चौकशी करून व दोषींवर कारवाई करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाने यावर दखल घेऊन कारवाई करण्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांना आदेश दिले आहेत.
चांदूर बाजार नगर परिषदेच्या चौदावा वित्त आयोग व विशेष रस्ता निधी अंतर्गत ४ कोटी ६९ लाखांच्या निविदा पालिकेने काढल्या होत्या. या प्रक्रियेत मुख्याधिकाऱ्यांनी काही मर्जीतील कंत्राटदारांना कामे दिली असल्याचा आरोप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला होता. या निविदा प्रक्रियेमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही केली नसल्याचा आरोप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यामुळे निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढून मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व कामांचे आदेश रद्द करून शासननिर्णयानुसार कारवाई करावी, असे आदेश २७ एप्रिलला देण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व कामांचे आदेश नगर परिषदेने रद्द केले, मात्र संगनमत करून विभागीय आयुक्तांनी रद्द केलल्या कंत्राटदारांनाच कामाचे पुन्हा आदेश देऊन मोठ्या प्रमाणात घोळ केला असल्याचा आरोप नगरसेवक तिरमारे यांनी केला आहे.