थिलोरी येथील रेशन दुकानदाराची पुरवठा अधिकाऱ्यांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:07+5:30
थिलोरी येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक तांबळे यांनी शासनाचे आदेश असतानाही कोरोना कालावधीतही सर्वसामान्य कुटुंबांना सुरळीत धान्यवाटप केले नाही. लोकांकडून जादा पैसे घेतले आहेत. दिलेल्या धान्याची पावतीसुद्धा दिली जात नाही. कोणी पावती मागायला गेल्यास त्याला शिवीगाळ करून हाकलून लावले जाते, अशा आशयाच्या तक्रारी थिलोरी येथील ग्रामस्थ वारंवार तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे पाठवित आहेत.

थिलोरी येथील रेशन दुकानदाराची पुरवठा अधिकाऱ्यांकडून चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : तालुक्यातील थिलोरी येथील रेशन दुकानदाराविरुद्ध नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तालुका पुरवठा अधिकारी गावात दाखल झाले. याप्रसंगी त्यांच्या पुढ्यात नागरिकांनी रेशन दुकानदाराविरुद्ध कारवाईची मागणी केली. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.
थिलोरी येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक तांबळे यांनी शासनाचे आदेश असतानाही कोरोना कालावधीतही सर्वसामान्य कुटुंबांना सुरळीत धान्यवाटप केले नाही. लोकांकडून जादा पैसे घेतले आहेत. दिलेल्या धान्याची पावतीसुद्धा दिली जात नाही. कोणी पावती मागायला गेल्यास त्याला शिवीगाळ करून हाकलून लावले जाते, अशा आशयाच्या तक्रारी थिलोरी येथील ग्रामस्थ वारंवार तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे पाठवित आहेत. अखेर गावकऱ्यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यानंतर पुरवठा अधिकाऱ्यांनी गावामध्ये येऊन स्वस्त धान्य दुकानदाराच्या दुकानातील सर्व दस्तावेजांची तपासणी करून घेतली. एकालाही धान्य पुरवठ्यापासून वंचित ठेवू नये, असे आदेश स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आले. यावेळी शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानासमोर फिजिकल डिस्टन्ससिंग न पाळता गर्दी केली होती. तथापि, गर्दी करणाºया या नागरिकांना हटकण्याचे वा त्यांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत निर्देश कुणी दिले नाही.
आम्ही स्वस्त धान्य दुकानदाराकडे वारंवार धान्यसाठ्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी गेलो. मात्र, दरवेळी आम्हाला अपुरी माहिती देता दुकानातून हाकलण्यात आले. संबंधित दुकानमालकावर तातडीने कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा.
-संगीता चोरपगार, दक्षता समिती सदस्य
संबंधित प्रकरणातील तक्रारी गावकऱ्यांकडून गावात जाऊन नोंदविण्यात आल्या. या तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर पुढील कारवाईची भूमिका स्पष्ट करण्यात येईल.
-प्रमोद काळे, पुरवठा निरीक्षक