सिंचन तलाव दुरूस्ती कामांची होणार चौकशी

By Admin | Updated: June 25, 2015 00:16 IST2015-06-25T00:16:31+5:302015-06-25T00:16:31+5:30

जिल्हा परिषद सिंचन विभागअंतर्गत येणाऱ्या वरूड उपविभागात करण्यात आलेल्या सिंचन तलाव दुरूस्ती कामात अनियमितता झाली आहे.

Inquiries of Irrigation Lake Repair works will be done | सिंचन तलाव दुरूस्ती कामांची होणार चौकशी

सिंचन तलाव दुरूस्ती कामांची होणार चौकशी

अमरावती: जिल्हा परिषद सिंचन विभागअंतर्गत येणाऱ्या वरूड उपविभागात करण्यात आलेल्या सिंचन तलाव दुरूस्ती कामात अनियमितता झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या वरूड उपविभाग अंतर्गत करण्यात आलेल्या तालुक्यातील तीन गावात करण्यात आलेल्या सिंचन तलाव दुरूस्तीत मोठी अनियमीतता झाली असल्याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य विक्रम ठाकरे सभापती गिरीष कराळे विजय श्रीराव व इतर काही पदाधिकाऱ्यांनी केली होती. या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत वरूड तालुक्यातील पिंपळखुटा, झोलंबा, आसोना येथील सिंचन तलाव दुरूस्तीचे कामात चुकीचे कामे दर्शवून देयके काढण्यात आली आहेत. यामध्ये पिंपळखुटा येथील तलाव दुरूस्तीच्या कामांसाठी सुमारे २१ लाख ८९ हजार मंजूर करण्यात आले होते. या कामांची निविदा काढतांना ७.८९ कमी दरात सदर काम १६ लाख ४७ हजार ४८ रूपये खर्च करण्यात आले आहे. मात्र दुरूस्तीचे कामे करताना लागणारे काही साहित्य तलावापासून शंभर मिटर अंतरावरून साहित्य वाहनाने आणले असतांना देयके काढतांना मात्र मटेरियल आणण्याचे ठिकाण चक्क दहा किलोमिटर दाखवून रक्कम काढण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेत या विषयावर सभेत चर्चाकरून सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिक्षक अभियंता यांच्याकडे प्रस्ताव सादर करून समिती नियुक्त करण्याचा आदेश पिठासन सभापती सतीश उईके यांनी दिले आहेत. यावेळी इतरही प्रश्नावर चर्चा करण्यात आली सभेला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीष कराळे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, सदस्या सदाशिव खडके ज्योती आरेकर, अरूणा गावंडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जे.एन आभाळे, कार्यकारी अभियंता पी.पी. पोटफोडे, उपअभियंता संजय येवले , सिंचन व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Inquiries of Irrigation Lake Repair works will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.