भूखंड वाटपातील घोळाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:24 IST2018-08-10T22:24:25+5:302018-08-10T22:24:46+5:30
तालुक्यातील खोपडा पुनर्वसन येथील भूखंड वाटपामधील घोळाची चौकशी करावी, अशी मागणी वरूड पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांनी केली. त्यांच्या नेतृत्वात समस्याग्रस्त ग्रामस्थांचे निवेदन मोर्शी येथे एसडीओंना देण्यात आले.

भूखंड वाटपातील घोळाची चौकशी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यातील खोपडा पुनर्वसन येथील भूखंड वाटपामधील घोळाची चौकशी करावी, अशी मागणी वरूड पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांनी केली. त्यांच्या नेतृत्वात समस्याग्रस्त ग्रामस्थांचे निवेदन मोर्शी येथे एसडीओंना देण्यात आले.
निम्न चारगड प्रकल्प बुडीत क्षेत्रात खोपडा हे गाव समाविष्ट आहे. २००७-०८ मध्ये भूसंपादन करण्यात आले, तर २०१७-१८ मध्ये नवीन संयुक्त मोजणी करण्यात आली. या दोन्ही यादीत घोळ असल्याने नवीन यादी प्रसिद्ध करण्यात यावी. नागदेवता मंदिराच्या संरक्षणार्थ भिंत उभारण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले.
निवेदन देताना विक्रम ठाकरे, नगरसेवक नितीन उमाळे, सागर ठाकरे, नीलेश लायदे, वसीम कुरेशी, राहुल बरडे, अमोल कुरवाडे, चंद्रकांत जवंजाळ, दिलीप लुंगे, दिलीप चौधरी, प्रभुदास सूर्यवंशी, विठ्ठलराव इंगोले, जानराव कुरवाडे, आशिष नाखले, प्रशांत इंगोले, नितीन लुंगे, राजेश पाचारे, भारत लुंगे, मुकुंदराव लुंगे, सूर्यकांत जवंजाळ, शिवा लुंगे, गजाननराव जवंजाळ, श्रीधरराव कुरवाडे, छोटू इंगोले, हरिश आकोटकर, राहुल चौधरी, मोतीलाल भोजने तसेच खोपडा येथील असंख्य नागरिक उपस्थित होते.