गरिबांच्या झोपडीवर अन्याय...
By Admin | Updated: June 3, 2015 00:20 IST2015-06-03T00:20:12+5:302015-06-03T00:20:12+5:30
बिच्छू टेकडी परिसरातील वीटभट्टीच्या जागेवरून झालेल्या वादात चार ते पाच मजूर महिलांच्या झोपड्या मंगळवारी ..

गरिबांच्या झोपडीवर अन्याय...
बिच्छू टेकडी परिसरातील वीटभट्टीच्या जागेवरून झालेल्या वादात चार ते पाच मजूर महिलांच्या झोपड्या मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जाळण्यात आल्या. वीटभट्टीचालक महिलेवर झोपड्या जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. वीटभट्टीचालक महिलेने चार महिला मजुरांवर चोरीचा आरोप केला आहे. मंगळवारी फे्रजरपुरा पोलिसांनी चारही महिलांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे शेकडो रहिवाशांनी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचून अन्यायाचा विरोध करीत रोष व्यक्त केला. अतिक्रमित जागेवर प्लॉट पाडून विकले जात असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. हे प्रकरण चिघळल्यावर हाणामारी झाली. त्यामध्ये दोन महिला जखमी झाल्यात. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. इन्सेटमध्ये जाळलेल्या झोपड्यांचे साहित्य.