शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जखमी सापावर महिनाभर उपचार, नंतर सोडले जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

हरणटोळ हा साप बिनविषारी असून, ता वेलीसारखा दिसतो. त्याचे तोंड झाडाच्या पत्त्यासारखे असल्याने त्याला शोधणे मोठे कठीण काम असते. हा साप दिसल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातच मणक्याला जबर मार बसला होता. दोन्ही डोळ्यांनी हरणटोळ बघू शकत नव्हता. परिणामी हेल्प फाऊंडेशनचे अभिषेक भाकरे, अजय यादव यांनी त्याला पशू चिकित्सालयात उपचारासाठी नेले होते.

ठळक मुद्देजळू येथे आढळला ‘हरणटोळ’ : मणक्याला मार, डोळ्यात संक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील जळू या गावात विचित्र असा हिरवा साप आढळला. त्याच्या मणक्याला जबर मार बसल्याने दोन्ही डोळ्यांना संक्रमण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वनविभागाच्या मदतीने हरणटोळ या सापावर महिनाभर उपचार केल्यानंतर बुधवारी जंगलात सोडले. हेल्प फाऊंडेशनने यात मोलाची कामगिरी बजावली.हरणटोळ हा साप बिनविषारी असून, ता वेलीसारखा दिसतो. त्याचे तोंड झाडाच्या पत्त्यासारखे असल्याने त्याला शोधणे मोठे कठीण काम असते. हा साप दिसल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातच मणक्याला जबर मार बसला होता. दोन्ही डोळ्यांनी हरणटोळ बघू शकत नव्हता. परिणामी हेल्प फाऊंडेशनचे अभिषेक भाकरे, अजय यादव यांनी त्याला पशू चिकित्सालयात उपचारासाठी नेले होते. पशू शल्यचिकित्सक देवराव हटकर यांनी उपचार केले. त्याच्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे पशू शल्यचिकित्सकांनी सांगितले. त्याअनुषंगाने वनविभागाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली. महिनाभर उपचारानंतर विभागाच्या मदतीने पोहरा जंगलात त्याला सोडण्यात आले. यात सुमेध गवई, अक्षय इंगळे, शुभम गायकवाड, अजय दोर्वेकर, अतिश भिमके, पवन देशमुख आदींची बरेच श्रम घेतले. यापूर्वी हेल्प फाऊंडेशनने अजगर, कोब्रा, धामण, घोणस आदी जातीचे सापांवर उपचार करून सुखरूप जंगलात सोडले आहे.हरणटोळ हा साप ११ जानेवारी रोजी जळू गावच्या परिसरात आढळून आला. तो जखमी असल्याने त्याचेवर उपचार करण्यात आला. शासकीय पशू शल्यचिकित्सकांच्या देखरेखीत उपचार करू न तो बरा झाला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोहरा जंगलात सोडले.- रत्नदीप वानखडेअध्यक्ष, हेल्प फाऊंडेशन अमरावती.

टॅग्स :snakeसाप