जखमी वृद्ध दगावला, महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:08+5:302021-03-16T04:14:08+5:30
अमरावती : क्षुल्लक कारणावरून महादेवखोरी स्थित गजानननगर परिसरात हाणामारीची घटना ११ मार्च रोजी घडली. यात गंभीर जखमी इसमाचा उपचारादरम्यान ...

जखमी वृद्ध दगावला, महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा
अमरावती : क्षुल्लक कारणावरून महादेवखोरी स्थित गजानननगर परिसरात हाणामारीची घटना ११ मार्च रोजी घडली. यात गंभीर जखमी इसमाचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाल्याने या घटनेतील मारेकरी महिलेविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी रविवारी भादंविचे कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा नोंदविला. जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याप्रकरणी यापूर्वीच महिलेला पोलिसांनी अटक करून तीन दिवसांचा पीसीआर मिळवला होता.
जनार्दन मारोतराव पखाले (६१), असे मृताचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारासह महादेखोरीच्या गजानननगर येथील रेखा जनार्दन पखाले (५०) ही महिला शेजारच्या डोंगरे दामपत्यासोबत जेवण आटोपल्यावर घरासमोर फिरायला जात असताना शेजारी राहणारी महिला वर्षा चंदन गुडदे(३५) हिने रेखा यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वाद घालून झटापट केली. त्यास सदर महिला ही किरकोळ जखमी झाली पत्नीसोबत सुरू असलेले भांडण सोडविण्याकरिता मृत पती जनार्दन यांनी मध्यस्थी केले असता, वर्षा गुडदे हिने शिवीगाळ करून वाद घातला. तसेच पखाले यांच्या डोक्यावर बल्लीच्या तुकड्याने प्रहार केला. जनार्दन पखाले यांच्या तक्रारीवरून आरोपी वर्षा गुडदेविरुद्ध आधी भादंविचे कलम ३०७ खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला व तिला अटक केली. मात्र, पखाले यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने खूनाच्या गुन्ह्याची कलम वाढविण्यात आल्याचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले.