एसटीच्या धडकेत महिला जखमी
By Admin | Updated: January 16, 2017 00:15 IST2017-01-16T00:15:14+5:302017-01-16T00:15:14+5:30
भरधाव एसटीने दुचाकीस धडक दिल्यामुळे दोन महिला जखमी झाल्यात. ही घटना रविवारी दुपारी दीपक चौकात घडली.

एसटीच्या धडकेत महिला जखमी
अमरावती : भरधाव एसटीने दुचाकीस धडक दिल्यामुळे दोन महिला जखमी झाल्यात. ही घटना रविवारी दुपारी दीपक चौकात घडली. मीणा मुंधडा (४८) व सीमा मुंधडा (दोन्ही राहणार बच्छराज प्लॉट) अशी जखमींची नावे आहेत. या अपघातप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी चालक देवानंद पारवे (रा.उमरखेड) विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
मीणा मुंधडा व सीमा मुंधडा या दोन्ही महिला त्यांच्या मोपेड क्रमांक एमएच २७-एपी ६५३५ ने बसस्थानक परिसरात आयोजित आर्ट आॅफ लिव्हींग शिबिरासाठी जात होत्या. त्या बच्छराज प्लॉटकडून बसस्थानकाकडे जात असताना दीपक चौकात इर्विनकडून वलगाव मार्गाकडे जाणाऱ्या बस क्रमांक एमएच १४-बीटी-४७५२ च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांच्या मोपेड गाडीस धडक दिली. यात दाघी जखमी झाल्यात. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून बस चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.