मोरचूंदवासीयांचा दारूबंदीसाठी पुढाकार
By Admin | Updated: January 30, 2016 00:20 IST2016-01-30T00:20:53+5:302016-01-30T00:20:53+5:30
तालुक्यातील मोरचूंद या गावात अवैध दारूविक्री राजरोसपणे केले जात आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे.

मोरचूंदवासीयांचा दारूबंदीसाठी पुढाकार
निवेदन : दारुबंदीसाठी महिलांनी कंबर कसली
वरूड : तालुक्यातील मोरचूंद या गावात अवैध दारूविक्री राजरोसपणे केले जात आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. वृध्दांपासून तर युवक, आणि शाळकरी मुलेसुध्दा व्यसनाधीन होत असल्याने चिंतेच सावट पसरले आहे. अनेक मुलांचे विवाह सोहळ्यामध्येसुध्दा आडकाठी येत असल्याने सामाजिक कार्यातसुध्दा बाधा येत असल्याने महिलांनी परिसरातील दारूविक्री बंद करण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी शेकडो महिलांनी ठाणेदार अर्जुन ठोसरे यांना निवेदन देऊन तातडीने दारुबंदी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छडण्याचा इशरा दिला आहे.
निवदेनानुसार गत एक वर्र्षापासून वरुड तालुक्यातील मोरचंूद या गावात अवैध दारू विक्री राजरोसपणे होत असून याकडे पोलिसांचे लक्ष वेधणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तरुणाई तसेच शाळकरी मुलेसुद्धा दारुच्या आहारी गेली आहेत.
गावातील तरुण दारुच्या आहारी गेल्याने याचा विपरीत परिणाम होऊन विवाह संबंधामध्येसुध्दा आडकाठी येऊ लागली लग्नसुध्दा जुळणे कठीण झाले. वृध्दापासून तर तरुणाईपर्यंत अगदी सर्व दारुच्या व्सनाधिन झाले . अनेकांचे पारिवारी्र भांडणे आणि पत्नी , पत्नीचे वाद चव्हाटरुावर येवून संसार उध्वस्त व्हायला लागले आहे. याबबात अनेक वेळा तक्रारी करुनही दारुबंदी झाली नाही .
अखेर दारु विक्री बंद करावी याकरीता गावातील महिलांनी कंबर कसली असून एल्गार पुकारला आहे. याबबात वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अर्जून ठोसरे यांना शेकडा ेमहिलसह स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देवून तातडीने दारुबंदी करावी अशी मागणी केली असून दारुबंदी झाली नाही तर स्वाभीमानी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येवून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी स्वाभीमानी येतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश राऊत, शाम ठाकरे, मनोज मानकर, पप्पू शेळके, सुनील शेळके, राजेश लायबरे, पंडित पाचपोहर, गुणवंता मानकर, गणेश ठाकरे, धम्मपाल धाडसे, अशोक वानखडे, अनिल मानकर, छबू कोरडे, जयश्री कोरडे, वच्छला मोहाड, सीमा काळे, रंजना वाघसह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)