पालकमंत्र्यांनी घेतली तालुक्याची माहिती

By Admin | Updated: June 7, 2017 00:17 IST2017-06-07T00:17:04+5:302017-06-07T00:17:04+5:30

तालुक्यात सतत तक्रारी पाहता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नुकतीच सर्व विभागातील अधिकाऱ्यांची त्यांच्या कामाबाबत आढावा बैठक घेतली.

Information about the taluka taken by the Guardian Minister | पालकमंत्र्यांनी घेतली तालुक्याची माहिती

पालकमंत्र्यांनी घेतली तालुक्याची माहिती

आढावा बैठक : ठाणेदार, मुख्याधिकारी, बीडीओंची झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : तालुक्यात सतत तक्रारी पाहता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नुकतीच सर्व विभागातील अधिकाऱ्यांची त्यांच्या कामाबाबत आढावा बैठक घेतली.
जनतेला होणाऱ्या पाणी समस्याचे जीवन प्राधिकरणकडून लवकरच निराकरण, जलशिवारची प्रलंबित कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना, न.प. कडून शहरातील अतिक्रमणाबाबत होत असलेली दिरंगाई यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश, शहर व ग्रामीण भागातील वाढत्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करून निपटारा करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात. यावेळी कमलकांत लाडोळे, मनोहर मुरकुटे आदी उपस्थित होते.

ठाणेदाराची कानऊघडणी
पालकमंत्र्यांनी अंजनगावच्या ठाणेदारांकडून व्यावसायिकांना होणारा विनाकारणचा त्रास व जनतेला मिळणारी वाईट वागणूक यावरून ठाणेदार सुधीर पाटील यांची पालकमंत्र्यांनी कानउघाडणी केली.

Web Title: Information about the taluka taken by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.