चिखलदरा तहसील ते आवार भिंतीच्या कामात निकृष्ट साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST2021-07-19T04:09:51+5:302021-07-19T04:09:51+5:30
फोटो पी १८ चिखलदरा (फोटो कॅप्शन : तहसील कार्यालयात संबंधित कंत्राटदाराने कामात वापरत असलेल्या बारीक गिट्टीची चुरी) चिखलदरा ...

चिखलदरा तहसील ते आवार भिंतीच्या कामात निकृष्ट साहित्य
फोटो पी १८ चिखलदरा
(फोटो कॅप्शन : तहसील कार्यालयात संबंधित कंत्राटदाराने कामात वापरत असलेल्या बारीक गिट्टीची चुरी)
चिखलदरा : सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येथील तहसील कार्यालयाच्या आवारभिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करण्यात आली आहेत. लाखो रुपये किमतीच्या या बांधकामात रेतीऐवजी गिट्टीच्या चुरीचा वापर कंत्राटदार करीत असून अधिकारी मूग गिळून असल्याचे चित्र आहे.
शासनाच्या विविध योजनेअंतर्गत मेळघाटात कोट्यावधी रुपयांची कामे करण्यात येत असली तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या साटेलोट्यामुळे मोठ्या प्रमाणात कंत्राटदाराला मुभा दिली जात असल्याचे चित्र चिखलदरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिसत आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात भिंत कामात सुरू असलेला हा प्रकार धक्कादायक आहे. यासंदर्भात प्रहारचे चिखलदरा संपर्कप्रमुख विनोद लांजेवार यांनी आक्षेप घेतला तक्रार नोंदविली आहे.
बॉक्स
कामाबद्दल अधिकारी अनभिज्ञ?
तहसील कार्यालयाच्या आवारभिंतीचे काम जवळपास २५ लक्ष रुपये खर्चून होणार आहे. प्रत्यक्षात या कामाबद्दल चिखलदरा उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर हेच अनभिज्ञ असल्याची बाब पुढे आली आहे. त्यांना विचारणा केल्यानंतर हा सर्व खुलासा झाल्याचे प्रहारचे संपर्कप्रमुख विनोद लांजेवार यांनी लोकमतला सांगितले. यासंदर्भात पाटणकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
बॉक्स
कुणाचीच भीती नाही
तहसील कार्यालय अगदी मुख्य रस्त्यावर आहे. येथून सर्व प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी जातात. तालुका दंडाधिकारी कार्यालयाच्या आवारात काम करतानाही नियमबाह्य साहित्य बेधडकपणे कंत्राटदार वापरीत आहे. त्यांना अभय कुणाचे, असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. चिखलदरा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतरही कोट्यवधी रुपयांच्या कामांची चौकशी होणे गरजेचे ठरले आहे.
कोट
अगदी मुख्य रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयाच्या आवारात काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू झाले आहे. त्यामध्ये नियमबाह्यरीत्या साहित्य वापरल्या जात असून, यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. दस्तुरखुद्द उपविभागीय अभियंता काम सुरू झाले का, याबाबत अनभिज्ञ होते.
- विनोद लांजेवार, प्रहार संपर्कप्रमुख, चिखलदरा
कोट
मिलिंद पाटणकर यायचा आहे
उपविभागीय अभियंता
सा बा विभाग चिखलदरा