अमरावतीत संक्रमित पोलिसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST2021-06-10T04:10:12+5:302021-06-10T04:10:12+5:30

अमरावती : गाडगेनगर ठाण्यातील गुन्हे शाखेत पोलीस जमादार म्हणून कार्यरत असलेले सुभाष रामचंद्र माने (५४, रा. तुळजाभवनी मंगल कार्यालयाजवळ) ...

Infected policeman dies in Amravati | अमरावतीत संक्रमित पोलिसाचा मृत्यू

अमरावतीत संक्रमित पोलिसाचा मृत्यू

अमरावती : गाडगेनगर ठाण्यातील गुन्हे शाखेत पोलीस जमादार म्हणून कार्यरत असलेले सुभाष रामचंद्र माने (५४, रा. तुळजाभवनी मंगल कार्यालयाजवळ) यांचा बुधवारी कोरोना आजाराने शहरातील एका खासगी कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने शहरात चार पोलिसांचा मृत्यू झाला. कोरोनायोद्धा म्हणून लढतांना ते पाचवे शहीद ठरले आहेत.

माने यांची २६ मे रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना महेश भवन येथील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथील ‘झेनित ’हॉस्पटिलममध्ये उपचारकरीता दाखल केले. मात्र बुधवारी ९ जून रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास ते दगावले. मृत सुभाष माने यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. बुधवारी दुपारी कोविड नियमावलीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

Web Title: Infected policeman dies in Amravati