कुख्यात गुंडाची दगडाने ठेचूून हत्या
By Admin | Updated: April 6, 2015 00:22 IST2015-04-06T00:22:31+5:302015-04-06T00:22:31+5:30
खून, लुटमार व घरफोडीतील आरोपी तसेच कुख्यात गुंड रवी चरणदास पाटीलची रविवारी तीन ते चार जणांनी दगडाने ठेचून हत्या केली.

कुख्यात गुंडाची दगडाने ठेचूून हत्या
दोन आरोपींना अटक : फ्रेजरपुरा स्मशानभूमीतील घटना
अमरावती : खून, लुटमार व घरफोडीतील आरोपी तसेच कुख्यात गुंड रवी चरणदास पाटीलची रविवारी तीन ते चार जणांनी दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना फे्रजरपुरा परिसरातील हिन्दू स्मशानभूमीच्या आवारात दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली होती.
याप्रकरणी पोलिसांनी सागर भगवान कोरे (२०), सूरज मधुकर तायडे (२३, दोघेही रा. संजय गांधीनगर नं.२) यांना अटक केली आहे. संजय गांधीनगर क्रमांक २ मधील रहिवासी रवी चरणदास पाटील (४५) याचा दुपारी १२ वाजताच्या सुमारास तीन ते चार जणांशी वाद झाला होता. दुपारी २ वाजता आरोपींनी फोन करुन त्याला फे्रजरपुरा स्मशानभूमीत बोलविले. तेथे त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दुपारी २.१२ वाजता फे्रजरपुरा पोलिसांना दिली. पोलीस लगेच घटनास्थळी पोेहोचले होते.