औद्योगिक प्रगतीच्या मापनासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST2021-05-05T04:20:51+5:302021-05-05T04:20:51+5:30

महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचे स्वतंत्र वेब पोर्टल कार्यान्वित झाले असून, यामुळे राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येणार ...

Industrial production index for measuring industrial progress | औद्योगिक प्रगतीच्या मापनासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक

औद्योगिक प्रगतीच्या मापनासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक

महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचे स्वतंत्र वेब पोर्टल कार्यान्वित झाले असून, यामुळे राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अर्थ व सांख्यिकी महासंचालनालय व उद्योग संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन झाले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) देबाशिष चक्रवर्ती, अप्पर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह, अर्थ व सांख्यिकी संचालक र. र. शिंगे उपस्थित होते.

राज्यांनी औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणित करावा, अशी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची शिफारस आहे. त्यामुळे हे पोर्टल विकसित करण्यात आले असून, भविष्यात उद्योगविषयक महत्त्वाच्या आकडेवारीची उपलब्धता होणार आहे. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरविणे, ते प्रभावीपणे राबविणे, धोरणांचा नियमित आढावा घेणे यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी लागू संचारबंदीने अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. अशावेळी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग होणार आहे. उद्योगांची दरमहा माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी जिल्हा उद्योग कार्यालयाकडे असून, ती दर महिन्याच्या ५ तारखेला वेब पोर्टलवर नोंदवली जाणार आहे.

Web Title: Industrial production index for measuring industrial progress