रेमंडद्वारा देशातील सर्वाधिक गुंतवणूक अमरावतीत - देवेंद्र फडणवीस
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 10, 2023 17:48 IST2023-04-10T17:47:58+5:302023-04-10T17:48:46+5:30
पीएम मित्रा टेक्सटाइल पार्क भूसंपादनसंदर्भात आढावा

रेमंडद्वारा देशातील सर्वाधिक गुंतवणूक अमरावतीत - देवेंद्र फडणवीस
अमरावती : पीएम मित्रा योजनेंतर्गत देशात सात मेगा टेक्सटाइल पार्क मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील एकमेव प्रकल्प नांदगाव पेठ येथील अतिरिक्त एमआयडीसीमध्ये होत आहे. येथे रेमंड उद्योग देशातील सर्वांत मोठी गुंतवणूक करणार आहे व याशिवाय अन्य पाच ते सहा प्रकल्पदेखील येथे येत असल्याची माहिती पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.
केंद्र शासनाद्वारा मंजूर करण्यात आलेल्या या टेक्सटाइल पार्कच्या भूसंपादनासंदर्भात येथील नियोजन भवनात फडणवीस यांनी आढावा घेतला. सन २०२७-२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. एक हजार हेक्टरमध्ये हा प्रकल्प आहे. यातील ४१३ हेक्टर जागा आवश्यक आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पिंपळविहीर येथील २४२.८९ हेक्टर व दुसऱ्या टप्प्यात पिंपळविहीर व डीगरगव्हान येथील १७०.१८ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात येत आहे. यासाठी १६३ कोटींचा शासन निधी देण्यात आलेला आहे. एक आठवड्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत असल्याचे फडणवीस म्हणाले.
बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत तसेच उद्योग व वस्त्रोद्योग सचिवांनी ऑनलाइन सहभाग घेतला