विद्यापीठ अभ्यासक्रमात ‘भारतीय संविधान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST2021-01-15T04:12:03+5:302021-01-15T04:12:03+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमात ‘भारतीय संविधान’ हा विषय पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीत समाविष्ट ...

विद्यापीठ अभ्यासक्रमात ‘भारतीय संविधान’
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमात ‘भारतीय संविधान’ हा विषय पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीत समाविष्ट करण्यात आला आहे. विद्या परिषदेत या प्रस्तावाला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून खुला व ऐच्छिक असणार आहे.
सिनेट सदस्य मनीष गवई यांनी ९ मार्च २०२० रोजीच्या सिनेट सभेत ‘भारतीय संविधान’ हा विषय पदवी अभ्यासक्रमात अनिवार्य करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव सिनेटने विद्या परिषदेच्या शिफारशीकडे पाठविला होता. ४ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या विद्या परिषदेत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमात ‘भारतीय संविधान’ हा विषय खुला ऐच्छिक म्हणून पसंतीवर आधारीत श्रेयांक पद्धतीत समाविष्ट करण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ शिकता येणार आहे. मनीष गवई यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना नवी संधी मिळणार आहे.