‘योगा’च्या बळावर भारत जगाचे नेतृत्व करणार
By Admin | Updated: November 6, 2014 22:48 IST2014-11-06T22:48:44+5:302014-11-06T22:48:44+5:30
योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे आगामी काळात योगाच्या बळावर भारत देश जगाचे नेतृत्व करेल, असा आशावाद आमदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.

‘योगा’च्या बळावर भारत जगाचे नेतृत्व करणार
अनिल बोंडे यांचे प्रतिपादन : राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचा समारोप
अमरावती : योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे आगामी काळात योगाच्या बळावर भारत देश जगाचे नेतृत्व करेल, असा आशावाद आमदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.
बाराव्या बृहन महाराष्ट्र योग व ३३ व्या राज्यस्तरिय योगासन स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, योगाच्या अभ्यासातून सकारात्मक विचारांची शिदोरी मिळते. त्यामुळे आरोग्य सुदृढ होऊ शकते. स्वामी विवेकानंद, योगाचार्य बी.के.एस अय्यंगार यांच्या सारख्या महान विभुतींनी मोठया कष्टाने सुरू केलेली योगक्रिया देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तरीही आतापर्यंत योगाबाबत अनास्था होती. परंतु योगगुरू रामदेवबाबांसारख्या योगसाधकांमुळे योगाला महत्व आले आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही योगाचा झपाटयाने प्रसार होत आहे.
योगाला महत्व प्राप्त करून देण्यासाठी शासनाने जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर आणी राष्ट्रीयस्तरावर योग स्पर्धा सुरू कराव्यात, असेही आमदार बोंडे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला योग परिषदेचे अध्यक्ष मुकुंद भोळे, हव्याप ्रमंडळाचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य, वसंत हरणे, माधुरी चेंडके, सरकार्यवाहक अरूण खोडस्कर, जिल्हा योग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बोके, महिला योग असोसिएशनच्या अध्यक्ष अंजली कुथे, सतिश मोहगावकर, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, सुभाष शर्मा आदींची उपस्थिती होती. यावेळी योगक्षेत्रात उकृष्ट कार्यकरणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यामध्ये सुंदरलाल श्रीवास्तव, इंदुमती कुथे, वामनराव तायडे, गोविंद राऊत, सुधाकर वेरूळकर, स्पर्धचे पंच, तंत्रज्ञ यांचा समावेश होता. याशिवाय ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व जिल्हा योग असोसिएशनतर्फे आयोजित बाराव्या बृहन महाराष्ट्र योग व ३३ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या ८ ते ११ वयोगटातील एकूण बारा मुले आणि मुली, ११ ते १४ वयोगटातील एकूण बारा मुले आणि मुली तसेच १७ ते २१ वयोगटातील एकूण सहा मुले आणि मुली, २५ ते ३५ वयोगटातील खेळाडुंचा व ३५ वर्षांवरील महिला आणि पुरूष अशा एकूण सात अशा राज्यभरातील खेळाडुेंनी स्पर्धत बाजी मारली. संचालन पी. आर. राजपूत, संजय मराठे यांनी केले.
संमेलन व स्पर्धेसाठी जिल्हा योग व महिला योग असोसिएशनचे पदाधिकारी, हव्याप्र मंडळ यांनी प्रयत्न केले.