रवी राणांनी फडकविला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा

By Admin | Updated: May 2, 2016 00:11 IST2016-05-02T00:11:04+5:302016-05-02T00:11:04+5:30

१ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन साजरा होत असताना वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे.

Independent Vidarbha flag marched by Ravi Rana | रवी राणांनी फडकविला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा

रवी राणांनी फडकविला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा

अमरावती : १ मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन साजरा होत असताना वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आ. रवी राणा यांच्या पुढाकाराने रविवारी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या समर्थनार्थ गगनभेदी नारेबाजी करण्यात आली.
येथील राजापेठस्थित युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यालयात आ. राणा यांच्या हस्ते स्वतनत्र विदर्भ राज्य निर्मितीचा झेंडा फडकाविण्यात आला. यावेळी आ. राणा यांनी राज्यकर्त्यांनी विदर्भावर कसा अन्याय केला, हे उदाहरणानिशी मांडले. विदर्भाचा विकास करायचा असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीशिवाय शक्य नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीसाठी ही योग्य वेळ आहे. भाजपने निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळून वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी, असे ते म्हणाले. यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी ‘झालेच पाहिजे, झालेच पाहिजे वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहिजे’ अशी नारेबाजी केली. यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जीतू दुधाने, सनजय हिंगासपुरे, सुमती ढोके, शैलेंद्र कस्तुरे, भास्करराव मानमोडे, अनिल कडू, उमेश ढोणे, अनुप अग्रवाल, नीलेश मेश्राम, गौतम हिरे, सचिन भेंडे, मीरा कोलटके, जयंतराव वानखडे, लता अंबुलकर, प्रियंका भुजाडणे, थोरात काका, अंकुश गणेशपुरे आदी उपस्थित होते. दरम्यान स्वतंत्र विदभर राज्य निर्मितीच्या मागणीने परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Independent Vidarbha flag marched by Ravi Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.