स्वातंत्र्य दिन विशेष छायाचित्र-संंदेश स्पर्धा

By Admin | Updated: August 13, 2015 00:59 IST2015-08-13T00:59:26+5:302015-08-13T00:59:26+5:30

‘लोकमत’ व सामरा वर्ल्डच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन १५ आॅगस्ट रोजी ‘हॅलो अमरावती’मध्ये चिमुकल्यांची

Independence Day special photo-competition competition | स्वातंत्र्य दिन विशेष छायाचित्र-संंदेश स्पर्धा

स्वातंत्र्य दिन विशेष छायाचित्र-संंदेश स्पर्धा

सहभागासाठी आज शेवटचा दिवस : ‘लोकमत’-सामरा वर्ल्डचा उपक्रम
अमरावती : ‘लोकमत’ व सामरा वर्ल्डच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन १५ आॅगस्ट रोजी ‘हॅलो अमरावती’मध्ये चिमुकल्यांची तसेच त्यांच्या पालकांचीही छायाचित्रे सामाजिक किंवा देशप्रेमाचे संदेशांसह प्रकाशित केली जाणार आहेत. उद्या १३ आॅगस्टपर्यंतच या स्पर्धेसाठी छायाचित्रे व संदेश स्वीकारण्यात येणार आहेत.
या विशेष उपक्रमांतर्गत १ ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे छायाचित्र सोबत देशप्रेमाचा किंवा सामाजिक संदेश प्रकाशित केला जाईल. पहिल्या १०० छायाचित्रांना प्रत्येकी २०० रूपयांचे सामरा वर्ल्डचे गिफ्ट कुपन दिले जाईल. प्रकाशित झालेल्या छायाचित्रांमधून ‘लकी ड्रॉ’ द्वारे विजेत्यांची निवड केली जाईल.
पहिले बक्षिस वुडन आलमारी, द्वितीय पुरस्कार इलेक्ट्रॉनिक्स बाईक, बेबी स्पेशल सुटकेस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे १५ उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात येतील. १६ ते ६० वर्ष वयोगटातील वाचकांनाही त्यांची छायाचित्रे विशेष संदेशांसह प्रकाशित करून घेण्याची संधी या विशेष उपक्रमांतर्गत ‘लोकमत’ने उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमांतर्गत मोजकीच छायाचित्रे स्वीकारण्यात येणार असल्याने इच्छुकांनी त्यांची स्वत:ची व चिमुकल्यांची छायाचित्रे ‘लोकमत’ कार्यालय, मोर्शी रोड, विभागीय क्रीडा संकुल येथे आणून द्यावीत किंवा ‘लोकमत व लोकमत समाचार’च्या वार्ताहरांकडे गोळा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०८८८८८५१३६२६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Independence Day special photo-competition competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.