स्वांतत्र्यदिनी तरुणाईचा बेधुंद जल्लोष
By Admin | Updated: August 17, 2015 00:10 IST2015-08-17T00:10:33+5:302015-08-17T00:10:33+5:30
स्वांतत्र्यदिनी तरुणाईचा बेधूंद जल्लोषात कर्कश्श हार्न वाजविण्यात आल्याने जनसामान्य हैराण झाले होते.

स्वांतत्र्यदिनी तरुणाईचा बेधुंद जल्लोष
पोलिसांचे दुर्लक्ष : कर्कश्श हॉर्नने हैराण
अमरावती : स्वांतत्र्यदिनी तरुणाईचा बेधूंद जल्लोषात कर्कश्श हार्न वाजविण्यात आल्याने जनसामान्य हैराण झाले होते. ध्वनी प्रदूषणाकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.
हजारोंच्या बलिदानानंतर खऱ्या अर्थाने भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले. मात्र, सद्यस्थितीत स्वातंत्र दिनाची परिभाषा केवळ जल्लोष आणि तोही अतिउत्साहाचा अशीच आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या जल्लोषात काही तरुण वर्ग जनसामान्यांना विसरून बेंधूद कर्कश्श हार्न वाजवीत वाहने चालविताना आढळून आले आहे. अल्पवयीन व तरुण वर्ग शेकडोच्या संख्येत मार्गावर भरधाव दुचाक्या घेऊन जल्लोष करीत होते. शहरात सायलेंट झोन तयार आहेत. मात्र, त्यांचीही पर्वा न करता काही युवा वर्ग कर्कश्श हार्न वाजवीत होते. काही मार्गावर दुचाकीच्या रांगा लावून फोटो सेशन झाले. अनेक वाहनधारक जल्लोषात अडकून पडले होते. मात्र, त्यांनाही पुढे जाण्याचा मार्ग सापडत नव्हता, आरडाओरड, ध्वनी प्रदूषण व भरधाव वाहन चालविणे हा सकला स्वातंत्र्य? ही बाब वाहतूक शाखा पोलिसांच्यासमोर घडत होती, मात्र, स्वांतत्र दिन व तरुणांच्या जल्लोषात कारवाई करायची कशी, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला होता. मात्र, पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६८ वाहनधारकांवर कारवाई करून १९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तरुणांनी स्वांतत्र दिनाचे महत्त्व समजून जल्लोषाची परिभाषा बदलविण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वांतत्र्यात जगत असल्याचा अनुभव जनसामान्यांना कळू शकेल, अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी मांडल्यात. (प्रतिनिधी)