प्रतीक्षा यादी न लावल्यास बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:16 IST2021-07-07T04:16:01+5:302021-07-07T04:16:01+5:30
कृषिसेवक भरती-२०१९, उमेदवारांचा इशारा अमरावती : कृषी विभाग अंतर्गत राबविण्यात आलेल्या कृषिसेवक भरती-२०१९ ची प्रतीक्षा यादी १५ दिवसांत न ...

प्रतीक्षा यादी न लावल्यास बेमुदत उपोषण
कृषिसेवक भरती-२०१९, उमेदवारांचा इशारा
अमरावती : कृषी विभाग अंतर्गत राबविण्यात आलेल्या कृषिसेवक भरती-२०१९ ची प्रतीक्षा यादी १५ दिवसांत न लावल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा उमेदवारांनी दिला आहे.
कृषी विभागामार्फत अमरावती विभागासाठी एकूण १९७ रिक्त पदांसाठी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी परीक्षा घेण्यात आली. ५ जानेवारी २०२० रोजी केवळ १७९ पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यापैकी ३२ उमेदवारांना दस्तऐवज चाचणीत व इतर कारणांसाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे अमरावती विभागात आतापर्यंत केवळ १४७ उमेदवारांची निवड करण्यात आली, तर तसेच ५० पदे रिक्त आहेत. राज्यभरात केवळ अमरावती विभागात प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. येत्या १५ दिवसांत यादी न लावल्यास बेमुदत उपोषणाला बसू तसेच क्रांतिदिनी मंत्रालयावरून उडी घेऊ,
असे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्यावतीने सागर ढेरे यांनी कळविले आहे.