सुलभातार्इंना वाढता प्रतिसाद
By Admin | Updated: October 7, 2014 23:28 IST2014-10-07T23:28:16+5:302014-10-07T23:28:16+5:30
बडनेरा विधानसभा मतदरासंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व पिरिपा (कवाडे गट) च्या उमेदवार सुलभाताई खोडके यांनी ५ आॅक्टोबर रोजी कंवरनगर, दस्तुरनगर परिसरात आशीर्वाद पदयात्रा काढली.

सुलभातार्इंना वाढता प्रतिसाद
अमरावती : बडनेरा विधानसभा मतदरासंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व पिरिपा (कवाडे गट) च्या उमेदवार सुलभाताई खोडके यांनी ५ आॅक्टोबर रोजी कंवरनगर, दस्तुरनगर परिसरात आशीर्वाद पदयात्रा काढली. यावेळी परिसरातील नागरिक आणि विशेषत्वाने महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
परिसरातील दुर्गामाता मंदिर, संत सतराम धाममार्गे या पदयात्रेने मार्गक्रमण केले. यावेळी सुलभा खोडकेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. जनतेच्या या प्रतिसादाबद्दल सुलभातार्इंनी कृतज्ञता व्यक्त केली. या आशीर्वाद पदयात्रेत कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी विविध घोषणेतून उपस्थितांचे लक्ष वेधले. पदयात्रेत मेघनाथ अरोरा, नगरसेवक राजेंद्र महल्ले, बाबासाहेब गौरखेडे, पप्पूसेठ खत्री, बाबूसेठ खत्री, अनिल तरडेजा, संजय कुकरेजा, अश्विन लुल्ला, बाबासाहेब राऊत, शिवपालसिंह ठाकूर, आत्माराम कुकरेजा, वनमाला हिरडे, सतीश कुकरेजा, सचिन पवार, योगेश खत्री, बाबूसेठ मतानी, सीमा रहाटे, साहिल मतानी, मुकेश फेरवानी, नगरेसवक अविनाश मार्डीकर, हितेश खत्री, जयप्रकाश वर्मा, पंजाबराव धुमाळे, महेश वर्मा, विजयकुमार घुंडियाल, रमेशलाल वर्मा, मंगेश खेडकर, रोहित वर्मा, मनोहर रहाटे, रितेश वर्मा, नितीन कुकरेजा, माजी नगरसेवक नंदकिशोर हरणे, महेंद्र वर्मा, अमरलाल खत्री, पंकज खत्री, अरूण लुल्ला, संजय मतानी, राज घुंडियाल, किशोर भागवानी, अभय चिंचमलातपुरे आदी उपस्थित होते.