लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘लॉकडाऊन’च्या काळात रेल्वे बोर्डाने ९ एप्रिलपासून सुरू केलेल्या कोविड पार्सलमधून उत्पन्न वाढीस लागले आहे. मे, जून या दोन महिन्यात मालाची वाहतूक वाढली असून, जिल्ह्यातून दरदिवशी मासे, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू पाठविल्या जात आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या मालातून दरदिवशी चार ते पाच हजार रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.कोविड पार्सल ही ९ एप्रिलपासून सुरू करण्यात आली. मात्र, एप्रिल महिन्यात फारशा प्रमाणात या रेल्वे गाडीतून मालाची वाहतूक झाली नाही. केवळ दोन, चार दिवस औषधांचे पार्सल बाहेर गावाहून मागविण्यात आले. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचे टप्पे वाढत गेले. यामध्ये शिथिलता येताच अमरावती येथील औषध विक्रेत्यांनी अहमदाबाद, रायपूर, राजकोट आदी ठिकाणांहून पार्सल बॉक्स मागविले आहे. हल्ली नियमितपणे औषधांचे पार्सल मागविले जात आहे.पोरबंदर- शालीमार व हावडा-शालीमार, नागपूर-शालीमार अशा कोविड रेल्वे पार्सल सुरू आहे. औषधांचे १०० ते १५० बॉक्स मागविण्यात येत असल्याची नोंद रेल्वे पार्सल विभागात करण्यात आली आहे. तर, मुंबईकडे पाठविले जाणारे मासे, भाजीपाल्यातून रेल्वेला उत्पन्न मिळत असल्याची माहिती पार्सल विभागाचे प्रमुख व्ही. एस. चारदेवे यांनी दिली.अहमदाबादमार्गे प्रवाशांची गर्दीहावडा- अहमदाबाद एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेल अशा दोन प्रवासी गाड्या १ जूनपासून बडनेरा रेल्वे स्थानकावरून धावत आहेत. मात्र, अहमदाबाद मार्गे जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढली असून, मुंबईकडे प्रवाशांची तूर्तास पसंती नसल्याचे आरक्षण यादीवरून दिसून येत आहे. हावडा- अहमदाबाद एक्सप्रेसने दरदिवशी १५ ते २० प्रवासी जात असल्याची माहिती आहे. रेल्वे बोर्डाने देशभरात १०० विशेष प्रवासी गाड्या सुरू केल्या असून, यात दोन गाड्या बडनेरा रेल्वे स्थानकाहून धावत आहेत.
कोविड रेल्वे पार्सलमधून उत्पन्नवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST
कोविड पार्सल ही ९ एप्रिलपासून सुरू करण्यात आली. मात्र, एप्रिल महिन्यात फारशा प्रमाणात या रेल्वे गाडीतून मालाची वाहतूक झाली नाही. केवळ दोन, चार दिवस औषधांचे पार्सल बाहेर गावाहून मागविण्यात आले. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचे टप्पे वाढत गेले. यामध्ये शिथिलता येताच अमरावती येथील औषध विक्रेत्यांनी अहमदाबाद, रायपूर, राजकोट आदी ठिकाणांहून पार्सल बॉक्स मागविले आहे.
कोविड रेल्वे पार्सलमधून उत्पन्नवाढ
ठळक मुद्देमुंबईकडे मासे, भाजीपाला रवाना : अहमदाबाद, रायपूर, राजकोट येथून औषधी मागविण्यास पसंती