बडनेऱ्यात कोरोनाग्रस्तांची संख्यावाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:01:36+5:30

सुरुवातीला जुन्या वस्तीच्या नूर नगरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर नव्या वस्तीच्या कुरेशीनगरात दोन हे सर्व बरे झालेत. त्यानंतर आरपीएफचे पाच जवान पॉझिटिव्ह आलेत. ते सर्व बाहेरगावचे आहेत. त्यांचा शहराशी फारसा संपर्क आला नाही. यापैकी एकाची प्रकृती सुधारली. १० दिवसांत जुन्या वस्तीतील वाटाघाटीच्या व नवीन भागात कोरोना बाधित पाच रुग्ण सापडलेत.

Increase in the number of corona victims in Badnera | बडनेऱ्यात कोरोनाग्रस्तांची संख्यावाढ

बडनेऱ्यात कोरोनाग्रस्तांची संख्यावाढ

ठळक मुद्देचार कंटेन्मेंट झोन : नवीन भागात संक्रमण चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : बडनेऱ्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतीच आहे. चार कंटेनमेंट झोनसह नवीन भागात झालेली एंट्री कोरोनाची धडकी भरविणारी ठरत आहे.
सुरुवातीला जुन्या वस्तीच्या नूर नगरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर नव्या वस्तीच्या कुरेशीनगरात दोन हे सर्व बरे झालेत. त्यानंतर आरपीएफचे पाच जवान पॉझिटिव्ह आलेत. ते सर्व बाहेरगावचे आहेत. त्यांचा शहराशी फारसा संपर्क आला नाही. यापैकी एकाची प्रकृती सुधारली. १० दिवसांत जुन्या वस्तीतील वाटाघाटीच्या व नवीन भागात कोरोना बाधित पाच रुग्ण सापडलेत. चावडी चौकात आई व मुलगा, कंपासपुऱ्यात ७० वर्षीय महिला त्याचप्रमाणे येथून जवळच असलेल्या सावता मैदानालगत गुरुवार, ११ जून रोजी आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले. बडनेरा शहरात संक्रमितांची साखळी तुटायचे नावच घेत नसल्याने रुग्णसंख्येत वाढच होत आहे. प्रशासन सातत्याने काळजी घेत आहे. औषधोपचार करीत आहे व नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहे. तेव्हाच बडनेरा या दाटीवाटीच्या शहरातील कोरोना रुग्णांचा प्रसार थांबेल, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे मत आहे.

स्वॅब टेस्टनंतरही मुलांमध्ये वावर
सावता मैदानालगत आलेला पॉझिटिव्ह रुग्ण स्वॅब टेस्ट दिल्यानंतर बिनधास्त त्याच्या मित्रांमध्ये बसल्याची चर्चा परिसरात जोरावर आहे. मात्र, त्या सर्वांना स्वॅब नमुने देण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. लोकांनी समोर यावे, असे आवाहन प्रशासन करीत आहे.

चौकाचौकांत बसून असतात जत्थे
बडनेऱ्यात चौकाचौकांत तरुणांचे जत्थे दिसतात. पोलिसांना बघून ते पळून जातात. त्यांच्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाही. मास्क कुणी तोंडाला बांधत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या नायनाटासाठी स्वत:हून नियम पाळण्याचे आवाहन आरोग्य अधिकाºयांनी केले आहे.

Web Title: Increase in the number of corona victims in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.