शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

चार प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 6:00 AM

सिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबविला. यात शेतातील पाटचºयांची देखभाल व दुरुस्ती टळली. त्या फोडण्याचा, बुजवून टाकण्याचा प्रकार थांबला.

ठळक मुद्देबच्चू कडू : अचलपूर मतदारसंघात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईप लाइन

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर मतदारसंघात कोट्यवधीचे सिंचन प्रकल्प कार्यान्वित झाले असून, यातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. सिंचनाकरिता आवश्यक कालव्यांची अपूर्ण कामे अस्तरीकरणासह बºयाच प्रमाणात केल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला.३०२.१४ कोटींचा करजगाव प्रकल्प, ५१५ कोटींचा बोर्डी प्रकल्प, ११०.३६ कोटींचा भगाडी प्रकल्प, ७५१.६७ कोटींचा वासनी प्रकल्प, ५० कोटींचा बेलोरा-गणोजा प्रकल्प आणि १९३.८१ कोटींच्या राजुरा प्रकल्पाकरिता विशेष प्रयत्न केल्याचे आ. कडू म्हणाले. चंद्रभागा, पूर्णा, चारघड, सपन प्रकल्पांच्या सिंचनक्षेत्रात वाढ झाली. चंद्रभागा प्रकल्पांतर्गंत ६१४७ हेक्टर, पूर्णा प्रकल्पांतर्गत ५४१७ हेक्टर, तर चारघड प्रकल्पांतर्गत १४५५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार योजनेतून मतदारसंघात नाला जोड प्रकल्प, नाला-नदी खोलीकरण, कालवा दुरुस्ती, नदी पुनरुज्जीवन, ई-क्लास जमिनीवर गावतलाव, शेततळे, खोदतळे, गॅबीयन बंधारे, सिमेंट बंधारे, डोहाच्या खोलीकरणासह अन्य कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.पाइप लाइनद्वारे सिंचनसिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबविला. यात शेतातील पाटचºयांची देखभाल व दुरुस्ती टळली. त्या फोडण्याचा, बुजवून टाकण्याचा प्रकार थांबला. शेवटच्या शेतकºयांपर्यंत पाणी पोहोचले. संत्रा बागायतदारांना संत्रा झाडाला ताण देणे शक्य झाले. पाटचारी फुटून पाण्यामुळे खराब होण्यापासून शेती वाचली. पाण्याची काटकसर आणि पिकाला लागणारे नेमके पाणी वापरता आले. पाण्याचा नाश टळला असून, प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. पाणी चोरीला जाण्याचा प्रकारही थांबला आहे. पाइप लाइनद्वारे सिंचन करणे अनेक प्रकल्पांवर प्रस्तावित असून, चंद्रभागा प्रकल्पानंतर सर्वच प्रकल्पांवर त्याला मान्यता मिळाल्याचा दावा आ. बच्चू कडू यांनी केला. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प