पुसला परिसरात ताप, सर्दी, अंगदुखीच्या रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:12+5:302021-05-07T04:13:12+5:30
पुसला : परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, अंगदुखी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, ...

पुसला परिसरात ताप, सर्दी, अंगदुखीच्या रुग्णांत वाढ
पुसला : परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, अंगदुखी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, नागरिकांमध्ये कोरोनाची भीती पसरल्याने ते घरगुती उपायांवर भर देत आहेत.
वरूड तालुक्यातील पुसला हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून गावात गेल्या काही दिवसापासून सर्दी, ताप, खोकला व अंगदुखीचे रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या आजाराने घरातील कुंटुब बेजार झाले आहे. गावतील पाणी टंचाई हे सुद्धा आजार वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. आधीच कोरोनाचा प्रादुर्भाव त्यातही या आजाराने तोंडवर काढल्यामुळे आपल्याला कोरोना तर झाला नसावा ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेकजण रुग्णालयात जाऊन उपचार करण्याचे टाळत असून कोरोना चाचणी करायला घाबरत आहे.
कोट
सर्दी, ताप, खोकल्याने अनेक रुग्ण फणफणत आहेत. रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. सर्दी, ताप, अंगदुखी हा आजार होताच नागरिकांनी घरीच राहावे व कोरोना चाचणी करून घ्यावी.
- निकिता सुरजुसे, वैद्यकीय अधिकारी, पुसला