कोरोनाच्या रुग्णांत वाढ; एसटीची प्रवासी संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:22+5:302021-02-26T04:18:22+5:30

अमरावती : काही आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी ...

Increase in corona patients; The number of ST passengers decreased | कोरोनाच्या रुग्णांत वाढ; एसटीची प्रवासी संख्या घटली

कोरोनाच्या रुग्णांत वाढ; एसटीची प्रवासी संख्या घटली

अमरावती : काही आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे एसटीची अनेक मार्गावरची प्रवासीसंख्या घटल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोनामुळे गतवर्षी सहा महिने बंद असलेली राज्य परिवहन महामंडळाची सेवा चार महिन्यांपासून पूर्ववत सुरू झाली होती. राज्यासह परराज्यातही बस सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र गेल्या काही आठवड्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे याचा परिणाम एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येवरही झाला आहे. लांबपल्यासह जिल्ह्यांतर्गत मार्गावरसुद्धा प्रवाशांचा प्रतिसाद बराचसा कमी झाला आहे. यात सकाळच्या सत्रातील बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद असून अनेक मार्गावरील दुपारच्या सेवेला मात्र प्रवाशांचा प्रतिसाद कमी दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे नागरिकांकडून प्रवास करण्याचे टाळले जात आहे. गत जानेवारी महिन्यापासून शाळा महाविद्यालय सुरू झाले असताना आता जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने पुन्हा आठवडाभराचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आहे. परिणामी सध्या शाळा महाविद्यालय व बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्रवासी नसल्याने अनेक मार्गावरील बसेसही सोडणे कठीण झाले आहे. त्यामुळे सध्या प्रवासी संख्येला पुन्हा एकदा प्रतिसाद घटला आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्व पदावर येणार नाही तोपर्यंत तरी एसटी बसला प्रवाशांचा प्रतिसाद पाहीजे तसा मिळणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

सूचना करूनही मार्क्स ना सोशल डिस्टन्स

अमरावती मध्यवर्ती आगारातर्फे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना बसमध्ये चढण्यापूर्वी माक्स वापरण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. मात्र, काही प्रवासी विनामाक्स आढळून येत आहेत. बसमध्ये प्रवाशांची संख्या मर्यादित झाल्यानंतरही वाहकांकडून अनेक प्रवाशांना बसमध्ये मास्क नसल्यास प्रवेश नाकारण्यात येत आहे.

बॉक्स

अनेक मार्गावर निम्मे प्रवासी

सध्या रेल्वेगाड्यांची संख्या अपूर्ण असल्यामुळे महामंडळाला कोरूना आंतर पुणे मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता रात्रीच्या व दिवसा जाणाऱ्या बसेसला प्रवाशांचा समाधान प्रतिसाद मिळत होता मात्र गत काही आठवड्यांपासून कोरोना रुग्ण वाढल्याने या मार्गावर त्यासुद्धा प्रवासी संख्या घटल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

बॉक्स

या मार्गावरून बसफेऱ्या कमी

कोरोनानंतर एसटी महामंडळाच्या बहुतांश मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या होता. विभागात एसटीच्या एकूण १८०० फेऱ्या चालविल्या जात होत्या. यातील ४०० फेऱ्या प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी तूर्तास बंद आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांचा यात समावेश आहे.

बॉक्स

एसटी ने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या -११०००००

लॉकडाऊन खुला केल्यानंतरची संख्या-८५०००

सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या- ५६३०७

Web Title: Increase in corona patients; The number of ST passengers decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.