काकड्यात कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:01 IST2020-06-08T05:00:00+5:302020-06-08T05:01:00+5:30

या चारही नाक्यावर शिक्षकांना कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले आहे. शिक्षक, पोलीस पाटील व कर्मचारी या नाक्यांवर सेवा देत आहेत. बाजार चौक ते शिंदी रस्ता, इसापूर रस्ता, रासेगाव रस्ता व कुष्टा रस्त्यावर हे कंटेनमेंट झोन आहे. या चार रस्त्यांवरच ते चार नाके आहे. लगतच्या तीन किमी. परिसरातील कोल्हा, इसापूर, वडनेर, शामपूर ही गावे बफर झोनमध्ये आली आहे.

Increase in containment zone in Kakda | काकड्यात कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ

काकड्यात कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ

ठळक मुद्देचालकाला अमरावतीला पाठविले : गावातील चार नाक्यांवर शिक्षक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील काकडा गावातील दोन युवकांचा थ्रोट स्बॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथे कंटेनमेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. गावातील व्यक्ती बाहेर आणि बाहेरचा व्यक्ती आत गावात प्रवेश करू नये, याकरिता चार नाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
या चारही नाक्यावर शिक्षकांना कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले आहे. शिक्षक, पोलीस पाटील व कर्मचारी या नाक्यांवर सेवा देत आहेत. बाजार चौक ते शिंदी रस्ता, इसापूर रस्ता, रासेगाव रस्ता व कुष्टा रस्त्यावर हे कंटेनमेंट झोन आहे. या चार रस्त्यांवरच ते चार नाके आहे. लगतच्या तीन किमी. परिसरातील कोल्हा, इसापूर, वडनेर, शामपूर ही गावे बफर झोनमध्ये आली आहे. बुरडघाट येथील कोविड सेंटरवर दाखल युवकाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे मुंबई कनेक्शन उघड झाले. तो मुंबईवरूनच कोरोना घेवून काकड्यात दाखल झाला होता. दरम्यान याला मुंबईवरून काकड्याला आणण्यासाठी अचलपूर-परतवाडा येथील गाडी मुंबईला गेली होती. या गाडीच्या चालकाचा शोध प्रशासनाने घेतला. या चालकासोबत अन्य एक युवकही मुंबईला गेला होता. या दोघांनाही प्रशासनाने अमरावतीला पाठविले आहे. तेथे त्यांचे थ्रोट स्वॅब घेतल्या जाणार आहे. बुरडघाट केंद्रात २२ पैकी ११ लोकांचे थ्रोट स्वॅब अहवाल यापूर्वीच निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना काकडा गावात पाठविण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी काकडा गावाला भेट दिली. परिस्थितीची माहिती घेत आवश्यक ते निर्देशही त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे. याप्रसंगी एसडीओ संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी जयंत बाबरे, ग्रामविकास अधिकारी वैशाली कोठवाल यांचेसह आरोग्य व पंचायत विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते.

Web Title: Increase in containment zone in Kakda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.