विषाणूजन्य ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ
By Admin | Updated: November 16, 2015 00:19 IST2015-11-16T00:19:48+5:302015-11-16T00:19:48+5:30
वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे अमरावतीत विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या एका महिन्यात दोन हजार ....

विषाणूजन्य ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ
महिनाभरात इर्विनमध्ये दोन हजार रुग्ण : ताप, खोकल्याची साथ
अमरावती : वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे अमरावतीत विषाणूजन्य ताप, खोकला व सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या एका महिन्यात दोन हजार रुग्ण या आजाराने ग्रस्त इर्विन रुग्णालयात नोंद झाली आहे.
इर्विन व डफरीन या शासकीय रुग्णालयांसह अमरावतीतील अनेक खासगी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.
आठवडाभर जर ताप असेल व ते चढउतार असेल तर टायफाईड, मलेरिया व इतर आजारांचीही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीची लाट जाणवू लागली आहे. तसेच डासांच्या उत्पत्तीतही वाढ होत आहे.
डासांसाठी हे वातावरण पोषक असून सायंकाळी घरोघरी डासांचा प्रहार होत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे हिवताप, मलेरियाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. अमरावती शहरात १०० च्या वर खासगी रुग्णलये आहेत. काही रुग्णालयाला भेटी दिल्या असता एका डॉक्टरकडे ८० ते ९० रुग्ण उपचारार्थ दाखल असल्याचे दिसून आलेत.
नागरिकांनी घराजवळ परिसरात स्वच्छता ठेवली व ताप झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास टायफाईड, मलेरिया, डेंग्यू व मेंदूज्वर होण्यापासून बचाव करणे शक्य होऊ शकतो, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.