महापालिकेत सामान्य प्रशासनाचा विसंगत कारभार

By Admin | Updated: June 7, 2014 00:36 IST2014-06-07T00:36:14+5:302014-06-07T00:36:14+5:30

स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांच्या निर्देशानुसार १0 जून रोजी विभागप्रमुख,

Incompetent administration of general administration in the municipal corporation | महापालिकेत सामान्य प्रशासनाचा विसंगत कारभार

महापालिकेत सामान्य प्रशासनाचा विसंगत कारभार

अमरावती :  स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांच्या निर्देशानुसार १0 जून रोजी विभागप्रमुख, अधिकार्‍यांची बैठक बोलाविण्यात आली आहे.  या बैठकीचे उपायुक्त, सामान्य प्रशासन यांनी अधिकार्‍यांना पत्र पाठविले. मात्र या पत्रात अधिकार्‍यांची क्रमवारी न ठेवता मर्जीनुसार तयार करण्यात  आली. त्यामुळे सामान्य प्रशासनाचा कारभार नियम विसंगत चालत असल्याचे स्पष्ट होते.
शुक्रवारी उपायुक्त, सामान्य प्रशासन यांनी १0 जून रोजीच्या बैठकीचे पत्र सर्व विभाग प्रमुखांना पाठविले. या पत्रात अधिकार्‍यांच्या पदानुसार कुठेही  तारतम्य जुळले नसल्याचे दिसून येते. लिपिकांनी यादी तयार करून उपायुक्तांच्या समोर ठेवली आणि ती यादी क्रमवारीनुसार आहे किंवा नाही, हे न  तपासता उपायुक्तांनी स्वाक्षरी करुन बैठकीचे पत्र जारी केल्याचे दिसून येते.
 

Web Title: Incompetent administration of general administration in the municipal corporation