- ही तर महापालिकेला काळिमा फासणारी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:47+5:302021-07-07T04:15:47+5:30
अमरावती : मनुष्यबळ पुरविण्याच्या निविदेसंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया होण्यापूर्वीच महापौरांच्या दालनात याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा होणे ही बाब महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ...

- ही तर महापालिकेला काळिमा फासणारी घटना
अमरावती : मनुष्यबळ पुरविण्याच्या निविदेसंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया होण्यापूर्वीच महापौरांच्या दालनात याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा होणे ही बाब महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडली. महापालिकेला काळिमा फासणारी ही घटना असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बबलू शेखावत व ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले यांनी केला. या बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांकडून लेखी खुलासा मागण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांना मंगळवारी निवेदनाद्वारे केली.
प्रशासनाच्या निविदेमध्ये पदाधिकाऱ्यांना कुठलाही हस्तक्षेप करता येत नाही. असे असताना महापौरांच्या कक्षात बैठक होत आहे व त्यामध्ये निविदा प्रक्रियेतील संबंधित अधिकारी उपस्थित राहत आहेत. असे झाल्यास सदस्यत्व रद्द होते, असा नियम आहे. त्यामुळे या निविदेची प्रक्रिया आजच फायनल करा, अधिकाऱ्यांवर दडपण येत असल्याचे पदाधिकारी म्हणाले. यावेळी नगरसेवक सलीम बेग युसूफ बेग, प्रशांत डवरे, शोभा शिंदे, अब्दुल वसीम, फिरोज खान, अनिल माधोगडिया, सादिक शाह, आसिफ अली, सुरेश रतावा, नसीम खान, राजा बांगडे, नीलेश गुहे, नसीम खान, अशोक रेवस्कार, गुड्डू हमीद, यासिर भारती, रशीद पठाण, रशीद लीडर, अब्दुल नाईम, प्रभाकर वालसे, बबलू राज, प्रवीण कदम, निखिल इंगोले, रोहित गवळी, हेमंत गोनेकर यांच्यासह शिवसेनचे प्रशांत वानखडे उपस्थित होते. प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
बॉक्स
गुप्ततेचा भंग, युवा स्वाभिमानचा आरोप
निविदा छाननी समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांकडून निविदा प्रक्रिया पद्धतीच्या गुप्ततेचा भंग झालेला आहे. त्यामुळे या सर्व सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीद्वारे मंगळवारी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला. यावेळी संजु हिंगासपूरे, चंद्रशेखर जावरे, सतेजसिंग पोटे, अनिल मिश्रा, बाळू इंगोले आदी उपस्थित होते.