राठीनगर ऐवजी संभाजीनगर नाव देऊन बसथांब्याचे उद्घाटन
By Admin | Updated: May 21, 2016 00:18 IST2016-05-21T00:18:06+5:302016-05-21T00:18:06+5:30
स्थानिक महापालिकेच्या राठी नगरस्थित बसस्थानकाचे नाव संभाजीनगर करून युवा सेनेने बुधवारी सायंकाळी

राठीनगर ऐवजी संभाजीनगर नाव देऊन बसथांब्याचे उद्घाटन
युवा सेनेचा पुढाकार : महाापालिकेच्या थांब्याचे नामकरण
अमरावती : स्थानिक महापालिकेच्या राठी नगरस्थित बसस्थानकाचे नाव संभाजीनगर करून युवा सेनेने बुधवारी सायंकाळी नामाकरण करून या बसस्थानकाचा उद्घाटन सोहळा साजरा केला आहे.
शहराला अंबादेवी तसेच थोर महापुरुषाचा जुना इतिहास लाभला आहे. परंतु या थोर संतांचा अवमान करण्याचा डाव महापालिकेने रचल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. याचे प्रत्युत्तर म्हणून महापालिकेच्या माध्यमातून एका खासगी कंपनीसोबत करार करून महानगरात जाहिरात करणारे बसस्थानक उभारले आहेत. गाडगेबाबा नगर बाजूला महापालिकेच्या रेकॉर्डवर पोष्टाच्या नोंदणीवर तसेच शासन दरबारी असलेल्या कागदपत्रावर संभाजी नगर असे नाव दिले. यासंदर्भात युवा सेनेने महानगरपालिकेला वारंवार निवेदन दिली होती. परंतु तरीसुद्धा बसस्थानकाला राठीनगर असे नाव महापालिकेने दिले. याचीच दखल घेत युवा सेनेने या बसस्थानकांचे नामातंरण केले आहे. युवा सेना शहरप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात बसस्थानकावर संभाजीनगर या नावाचे फलक लावून नामातंरणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषा टेंभरे, जिल्हाप्रमुख वर्षा भोयर, ललित झंझाड, बंडू देशमुख, गोपाल राणे, आशिष ठाकरे, विजय बेनोडकर, विजय ठाकरे, वैभव मोहोकार, श्याम मुळे, निखिल तिवारी, कौस्तुभ कोरडे, नितीन भोरे, कुणाल मंजलवार, गौरव गतफने, शुभम कुबडे, शुभम गाडवे, शुभम हिवसे, अनुराग बागडे, गौरव कांबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना शाखा संभाजी नगर शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. अशाप्रकारचे बसस्थान संपूर्ण शहरात असून त्या बसस्थानकावर महापुरुषांचे नाव वगळून दुसरे नाव दिले गेले. ती सर्व नावे १५ दिवसांच्या आत बदलावे, अन्यथा शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे. (प्रतिनिधी)