आरोग्य केंद्राकडून दिली जातेय अपुरी सेवा
By Admin | Updated: January 18, 2015 22:29 IST2015-01-18T22:29:43+5:302015-01-18T22:29:43+5:30
चांदूररेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अद्यापही आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशी सोयी मिळत नाहीत. आरोग्य विभागावर लाखोंचा खर्च होत

आरोग्य केंद्राकडून दिली जातेय अपुरी सेवा
प्रभाकर भगोले - चांदूररेल्वे
चांदूररेल्वे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अद्यापही आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशी सोयी मिळत नाहीत. आरोग्य विभागावर लाखोंचा खर्च होत असताना ग्रामीण भागातून रोगराईचे उच्चाटन होण्याऐवजी ती वाढतच असल्याची बाब या सभेत उघड झाली.
अपेक्षा होमिओ सोसायटीच्यावतीने आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सभा तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थान पंचायत समिती सदस्य नीलिमा होले होत्या. रबडे, मनू वरणे, आमला ग्रामपंचायत सदस्य सविता कुंभरे, चांदूरवाडीच्या सुनंदा डोेंगरे, आमदोरीचे अमोल राऊत, तालुका समन्वयक सोमेश्वर चांदूरकर, प्रभाकर भगोले उपस्थित होते. प्रारंभी वेणू वरणे यांनी सभेतील विषयांचे वाचन केले.
प्रत्येक गावात नेमून दिलेल्या आशा स्वयंसेविकांनी त्यांच्या अडचणी विशद केल्या. औषधांचा पुरवठा होत नसल्याची त्यांची ओरड होती. तरोडा येथील पारधी वसाहतीत आरोग्य सेवक-सेविका गेल्या नाहीत. बासलापूरच्या आशा सेविका आर्वी येथे राहाते. तेथूनच ती बासलापूरचा कारभार पाहते सहा महिन्यांपासून गरोदर महिलांना ग्रामीण भागात आहार बंद आहे जे आरोग्यसेवक ग्रामीण भागात जातात त्यांचे जवळ ओळखपत्र नाही. आरोग्य निधी दोन महिन्यांपासून नाही.
सालोरा खुर्द या गावातील नागरिकांना पाण्याचे नमुने तपासणीचा अहावलाची माहिती होत नसल्याने महिलांचे आजार वाढण्यास दूषित पाणीच कारणीभूत ठरत आहे, असा समज झाल्याने त्याबाबतचे निराकरण आरोग्यसेवकांकडून होत नाही. मांजरखेड (कसबा), जळका पटाचे गावात एनएएम कडून औषधी पुरवठा होत नाही. आरोग्य सेवकाला मांजरकेड (कसबा) येथे शासकीय निवासस्थान असताना निवासात राहत नाही. सालोरा, तरोडा गावात बालमृत्यू होत असल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा कुचकामी ठरल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली.
ही सभा दर तीन महिन्यांनी होत असली तर या सभा ग्रामपंचायत स्तरावर व्हाव्यात, असे मत आजच्या सभेत व्यक्त केले. आरोग्य विभागाच्या सोई सुविधांचा अभाव असला तरी नागरिकांची जनजागृती होणे गरजेचे आहे, असे सभे अंती ठरविण्यात आले. सेवेतील ही अनियमितता दूर करण्याची मागणी होत आहे.