शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

सहा लाख शेतक-यांना मिळावी विम्याची भरपाई, मूग, उडीद, सोयाबीन बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:29 IST

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला.

गजानन मोहोडअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला. पावसाच्या प्रदीर्घ तुटीमुळे खरिपाची मूग, उडीद व सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा हल्ला झालाय. परिणामी पिकांच्या उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांची घट होणार आहे. त्यामुळे खरीप पीकविमा काढलेल्या सहा लाख शेतक-यांना विम्याचा लाभ मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांपासून पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना मदत मिळावी, यासाठी यंदाच्या खरीप हंगामातील नऊ पिकांना विम्याचे कवच देण्यात आले. जिल्ह्यात अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविण्यात आली. ही योजना कर्जदार शेतक-यांसाठी सक्तीची, तर गैरकर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक होती. विभागातील ६ लाख ३ हजार ६५७ शेतक-यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३१ लाख ६२ हजार ५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पावसात खंड असल्यामुळे शेतक-यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसात खंड असल्यामुळे ६० दिवसांचे मूग व उडिदाचे पीक हातचे गेले. पावसाच्या सततच्या खंडामुळे सोयाबीन बाधित झाले, तर काढणीच्या काळात अवकाळी पावसामुळे प्रतवारी खराब झाली. एफएक्यू ग्रेड असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवरदेखील शेतक-यांना माघारी पाठविले जाते. कपाशीची तीच गत आहे. बीटीचे बोंड गुलाबी अळीने पोखरल्यामुळे कापसाचे सरासरी उत्पादन ५६ टक्क्यांनी घटले व दर्जाही निकृष्ट झाला. यंदाच्या हंगामात शेतकरी अडचणीत आला असल्याने त्याला विम्याची भरपाई मिळणे गरजेचे आहे.असा आहे जिल्हानिहाय सहभागपीकविमा योजनेत विभागात ६,०३,६५७ शेतकºयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १,६६,०४५, अकोला १,०३,०५१, वाशिम ८३,०५६, अमरावती ९५,९८२, तर यवतमाळ जिल्ह्यात १,५५,५२३ शेतकºयांचा सहभाग आहे. यामध्ये २,००,८३३ शेतक-यांनी आॅनलाइन, ४३,३६३ शेतक-यांनी जनसुविधा केंद्रात, १,९४,४७५ शेतकरी कर्जदार असल्याने सक्तीने, तर १,६४,९८६ गैरकर्जदार शेतक-यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. या सर्वांना लाभ मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.पावसाळ्यात ३६ दिवसच पाऊसयंदा विभागात सरासरी ७६ टक्के पाऊस पडल्याने २४ टक्के पावसाची तूट आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत केवळ ३६ दिवसच पाऊस पडला. यामध्ये जून महिन्यात ९ दिवस, जुलै १२, आॅगस्ट ९, सप्टेंबर ८, तर आॅक्टोबर महिन्यात फक्त ८ दिवसच पाऊस पडला असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. विभागातील पिकांचे सरासरी ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याचे शासनाला पाठविलेल्या अहवालात नमूद आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती