भाडे न देता म्हणे बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; महिलेसह दोघांविरूध्द गुन्हे
By प्रदीप भाकरे | Updated: March 12, 2023 14:48 IST2023-03-12T14:48:02+5:302023-03-12T14:48:27+5:30
भुयार यांनी आपल्या मालकीचा फ्लॅट संतोष कोलटके याला भाड्याने दिला आहे. मात्र कोलटके याने चार महिन्यांपासून भुयार यांना भाडे दिले नाही.

भाडे न देता म्हणे बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; महिलेसह दोघांविरूध्द गुन्हे
अमरावती - भाडेकरूला फ्लॅट सोडवेनाअमरावती: चार महिन्यांपासून थकलेली भाडयाची रक्कम न देता उलटपक्षी घरमालकालाच बलात्काराच्या खोट्या गुन्हयात फसविण्याची धमकी देण्यात आली. तथा घरमालकाकडून खंडणी वसूल करून आणखी रकमेची मागणी करण्यात आली. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोखले लेआऊटमधील योगिराज अपार्टमेंटमध्ये ११ मार्च रोजी सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी घरमालक सुभाष भुयार (६०, व्हिएमव्ही रोड, अमरावती) यांच्या तक्रारीवरून संतोष भीमराव कोलटके (४५, रा. जसापूर आसरा, ता. भातकुली) व एका महिलेविरूध्द खंडणीसंबंधांने गुन्हा दाखल करण्यात आला.
भुयार यांनी आपल्या मालकीचा फ्लॅट संतोष कोलटके याला भाड्याने दिला आहे. मात्र कोलटके याने चार महिन्यांपासून भुयार यांना भाडे दिले नाही. तर मागील दोन महिन्यांचे बिल देखील भरले नाही. त्यामुळे सुभाष भुयार हे ११ मार्च रोजी कोलटके यांच्याकडे भाडयाची रक्कम मागण्यासाठी गेले. त्यावेळी भाडे देत नाही अन् फ्लॅट खालीही करत नाही. खाली करून पाहिजे असेल तर २ लाख २० हजार रुपये द्यावे लागतील, असे कोलटके याने भुयार यांना बजावले. त्यावेळी भुयार यांनी त्याला भीतीपोटी २० हजार रुपये दिले.